Posts

Showing posts with the label My Blog

ब्लूमबर्ग रिपोर्ट, यू.एस. टॅरिफ आणि अजित दोबाल: भारत-अमेरिका संबंधांतील निर्णायक वळण

ब्लूमबर्ग रिपोर्ट, यू.एस. टॅरिफ आणि अजित दोबाल: भारत-अमेरिका संबंधांतील निर्णायक वळण डॉ. राजू श्रीरामे भ्रमणध्वनी - 7620881729 बॉक्स  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तियानजिन येथे भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल होताच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झाले. अमेरिकेला असे वाटू लागले की भारत चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जात आहे, ज्यामुळे अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी अजित दोबाल यांना वॉशिंग्टनला पाठवले, जेणेकरून भारत-अमेरिका संबंध पुन्हा स्थिर आणि मजबूत करता येतील. लेख अलीकडेच ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या रिपोर्टमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित दोबाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना कठोर शब्दांत सुनावल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भेटीनंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये आलेली कटुता कमी झाली आणि दोन्ही देशांचे संबंध अध...