विदर्भातील कापूस उत्पादन आणि बाजारभावातील बदल

विदर्भातील कापूस उत्पादन आणि बाजारभावातील बदल 
 
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे 
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९ 
ईमेल : smitarajan76@gmail.com 
बॉक्स 
सन २०१३ ते २०१८ पर्यंत कॉटन बाजारात मंदी आल्यामुळे देशभसतील अनेक सूत गिरण्या बंद झालेल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाला जी मागणी पाहिजे होती. तशाप्रकारे ती मिळत नसल्याने, त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून आलेला होता. यातच कोविडकाळातील महामारीचा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनाला रट्टा बसलेला होता. आता मात्र त्यात चीन अमेरिकेचे ट्रेड वॉर, आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेली मागणी, पाकिस्तानला माल देणे थांबविणे अशा विविध कारणांमुळे कापसाची मागणी घटली होती.
लेख  
यावर्षात कापसाचे उत्पादन करणा-या शेतक-यांना कापसाने मदतीचा हात दिलेला आहे असे दिसून येत आहे. सध्यातरी आंतरराष्ट्रीय बाजारात कपसाले चांगले दिवस आलेले असून बाजारभाव सुध्दा चांगला मिळालेला आहे. यंदाही कापूस शेतक-यांना मालामाल  करण्याचे संकेत मिळत असून सध्या भारतातील कापसाची मागणी ही वाढलेली असून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मागणीत सुध्दा वाढ घडून आलेली आहे.  
गेल्यावर्षी विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान झालेले होते, मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे  रेकॉर्डब्रेक भाव मिळालेला दिसून येत आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे  शेतक-यांचे प्रचंड नुकसान होऊनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  आजघडीला दिलासा मिळालेला असल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान आगामी वर्षात  २०२२ – २०२३ मध्ये देखील कापसाची मागणी कायम राहण्याची शक्यता कॉटन उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सन २०१३ ते २०१८ पर्यंत कॉटन बाजारात मंदी आल्यामुळे देशभसतील अनेक सूत गिरण्या बंद झालेल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाला जी मागणी पाहिजे होती. तशाप्रकारे ती मिळत नसल्याने, त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून आलेला होता. यातच कोविडकाळातील महामारीचा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनाला रट्टा बसलेला होता. आता मात्र त्यात चीन अमेरिकेचे ट्रेड वॉर, आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेली मागणी, पाकिस्तानला माल देणे थांबविणे अशा विविध कारणांमुळे कापसाची मागणी घटली होती. यातच मागील काळात कापसाचे उत्पादन  उत्पन्न हे सुमारे ३ कोटी ५० लाख गाठींपर्यंत झालेले होते, त्यामुळे कापसाला हमीभाव देखील पुरेसा मिळत नव्हता. मात्रा सन २०१९ पासून शासनाकडून सूत गिरण्यांना अनुदान देण्यात येत आहे. यामुळे बंद पडलेल्या सूत गिरण्या तसेच अवसायनात गेलेल्या सूतगिरण्या पुन्हाहून  सुरू होऊ लागल्या आहेत.
कापसाचे भाव जास्त राहण्याची काय आहेत कारणे ?
येणा-या काळात देशभरातील सूत गिरण्यांमध्ये कापसाची प्रचंड मागणी वाढणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. यावर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळाल्याने, जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस बाजारपेठेत आणणे सुरु केलेले आहे. येत्या काळात सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू होईल, तेव्हा जुना माल न राहिल्याने, नव्या मालालाच मागणी जास्त राहील. दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर ३० ते ४० लाख गाठी या जुन्याच असतात. मात्र यंदा यामध्ये मोठी घट होऊन, १ ते ३ लाख गाठीच जुन्या शिल्लक राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मागणी कायम राहणार आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाचे प्रमाण देखील भविष्यात वाढण्याचीही शक्यता आहे.
भारतात एकूण होणारे कापसाचे उत्पादन व बाजार मुल्य
भारतात जवळपास ३ कोटी ६० लाख गाठी देशातील बाजारात कापसाच्या उत्पादित होत असल्याचे दिसून येतात. मात्र ३ वर्षापूर्वीची कापसाच्या गाठीची एकूण  मागणी  ही २ कोटी ८० लाख गाठी ऐवढीच होती. 
परंतु आता  मात्र देशाच्या बाजारात कापसाची मागणी ही  ३ कोटी ४० लाख गाठी ऐवढी असलेली दिसून आलेली आहे. यात विदेशात होणारी निर्यात  केल्या जाणा-या  कापसाच्या ६० ते ७० लाख गाठी ऐव्द्या असतात. सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलवर गेलेले असून खुल्या बाजारातील हे दर शासनाच्या दरापेक्षा जास्त असलेले दिसून आलेले आहेत. सध्या शासनाने निश्चित केलेला हमीभाव हा ६ हजार रुपये प्रति क्विटल इवढा असून सध्यस्थितीत खासगी बाजारातील खुल्या बाजाराचा बाजारभाव दर हा ११,५०० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात खासगी बाजाराचे दर ७ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इव्ध्ये होते तर  नोव्हेंबर महिन्यातील दर ८ हजार ते ८२०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले दिसून आलेत. यात डिसेंबर २०२१  व जानेवारीचे २०२२ च्या दरात मात्र काहीसी घट होऊन ते दर ७ हजार ८०० ते ८२०० रुप्क़ये प्रति क्विंटल पर्यंत आलेले होते. यात फेब्रुवारी २०२२ मध्ये मात्र हेच बाजारभाव ९ हजार रुपये प्रति क्विंटल तर मार्च २०२२ मधील कापसाचे मुल्य १० हजार प्रति क्विंटल पर्यंत गेलेले होते. सर्वाधिक कापसाला बाजारभाव एप्रिल २०२२ मध्ये मिळालेला असून  हा बाजारभाव रेकॉर्डब्रेक १२ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचलेला असल्याचे दिसून आलेले आहे. यावर्षी देखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारात देखील चांगली मागणी रहाणार असून ही मागणी २०२२ – २०२२३ मध्ये सुध्दा कापसाला ही मागणी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. सध्यातरी सूत गिरण्यांमध्ये वाढ झालेली आहे. गुजरातमध्ये ५० लाख गाठींची गरज होती,  मात्र आता हीच मागणी १ कोटी गाठींपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा वाढण्याची सुध्दा दाट शक्यता आहे. भविष्यात सुध्धा कापसाचे प्रति क्विंटल ८ ते ९ हजारांपेक्षा भाव कमी होणार नाहीत असाच अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारले असल्यामुळे, कापूस उत्पादकांना होणारा फायदा  अधिकाधिक झालेला असून आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे भाव तडकल्याने स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर वधारलेले  दिसून आलेले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पौंड वर बंद झालेला कापसाचा सुचकांक सध्या चालू आठवड्याच्या शेवटी ७२.६९ सेंट प्रति पौंडवर बंद झालेला होता. यामुळेच वायदे बाजारात कापसाचा दर किमान ३१ हजार ५०० ते ५५ हजार ८०० रुपये प्रति कॅन्डीवर पोहचलेला आहे. दरम्यान, स्थानिक खासगी बाजारातही कापसाच्या किमान व कमाल दरात वाढ झालेली असून आज कापसाला कमाल ५७५० तर किमान ५६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वायदे बाजारात कापसाचे दर तडकल्याने विदर्भातील कापूस उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विदर्भात सोयाबीन, उडीद, मूग, तूर संत्रा या प्रमुख पिकांच्या दराने घोर निराशा केल्याने शेतक-र्यांची आशा आता कापूस हरभ-र्याच्या पीकावर अवलंबून आहे. दरम्यान सध्या कापसाच्या दरात तेजी आलेली असली तरी सध्या मिळणारे दर उत्पादनाच्या तुलनेत कमी असल्याने शेतक-र्यांनी अद्यापही कापसाची साठवणूक करण्याचाच पर्याय निवडलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असून वायदे बाजारातही तेजीत करार होत आहेत. याबरोबरच व्हिएतनाम, बांग्लादेश पाकिस्तानात कापसाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. परंतु त्यातुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे कापसाचे दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.  देशांतर्गंत असलेल्या साठवणूकदार कापूस मिल उद्योगाकडूनही कापसाची मागणी वाढत असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झालेला आहे. दरम्यानच्या काळात मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय कापसाचा वायदेबाजार ७२.३४ सेंट प्रति पौंड वर बंद झाला. चालू आठवड्यात कापसाच्या दरात वाढ होऊन बाजार ७२.६९ सेंट प्रति पौंडवर बंद झाला. त्यामुळे स्थानिक बाजारातही कापसाच्या किमान कमाल दरात वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात सरासरी ५५०० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल असलेल्या कापसाच्या दरात शनिवारी सरासरी शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झालेली दिसून आली.  
कापूस कमाल ५५ हजार ८०० रुपये प्रति कॅन्डी  
कॉटन असोशिएशन ऑफ इंडियानुसार वायदे बाजारात कापूस तडकल्याने कापसाच्या प्रति कॅन्डी (३३५.६२ किलो) क्विंटलमागे दरात दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे वायदे बाजारात ३१ हजार ५०० ते ५५ हजार ८०० रुपये प्रति कॅन्डी दराने कापूस खरेदी करण्यात आला. दरम्यान, न्यूयॉर्क कॉटन फ्युचरचा वायदे बाजार ७२.६९ सेंट प्रति पौंड, कॉटलुक ८१.५ तर इंटरकॉन्टीनेंटल एक्सचेंजचा (आयसीई) आंतरराष्ट्रीय वायदे बाजार ७२.६९ सेंट प्रति पौंडवर बंद झालेला दिसून आला. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिलपर्यंत कापसाच्या दरात मंदी येण्याची शक्यता असल्याने काळात बाजारभाव गडगडलेले होते.  
महाराष्ट्रातील इतर ठिकाणची स्थिती 
भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. खानदेशात कापसाचे विक्रमी उत्पादन दरवर्षी शेतकरी बांधव  घेत असतात. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Grower Farmers) कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर मोठे समाधान बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
कापसातील वाढीव बाजारभावाचा कोणाला मिळतोय जास्त फायदा
कापसाच्या दराने गेल्या 50 वर्षांचा उच्चाँकी स्तर गाठला असून या दरवाढीचा फायदा मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांना झाला आहे. या वाढलेल्या दराचा फायदा त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे ज्यांनी आपला कापूस काही काळ साठवला होता. आता कापसाचा हंगाम संपत आला तरी बाजारात कापसाची मागणी कायम असून दरात वाढ होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकऱ्यांच्या कापसाला एवढा चढा भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कापसाला विक्रमी दर मिळण्याचे कारण काय?
खरं पाहता, दीड-दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या रुस-युक्रेन युद्धामुळे सर्वच पिकांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. यामध्ये गहू आणि मोहरी हे प्रमुख असून यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये आता कापसाचा देखील समावेश झाला आहे. कापसाच्या तेजीचे आणखी एक कारण म्हणजे -मित्रांनो खरीप हंगामात गुलाबी बोन्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले असून, त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळेच बाजारपेठेत कापसाच्या मागणीनुसार उत्पादन होऊ शकले नाही, परिणामी भावात तेजीचा कल दिसून येत आहे. कापसाचे भाव सध्या विक्रमी पातळीवर असून शेतकऱ्यांसाठी पैसे कमवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सध्या बाजारात कापसाची आवक बऱ्यापैकी असल्याने पुढील १० दिवस अधिक खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
महाराष्ट्रातील कापसाचा बाजारभाव भाव प्रतिक्विंटल
 महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या भावाने १४,०००  रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे. यंदाच्या हंगामात आपल्या राज्यातील प्रमुख मंडईत कापसाचे भाव एकदाही घसरलेले नाहीत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा सर्वाधिक भाव मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत असल्याने येत्या खरीप हंगामात कापसाखालील क्षेत्र जास्त अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकरी आता अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीसाठी रस दाखवू शकतात. विदर्भातील वर्धा या जिल्ह्यामधील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सरासरी भाव १३,२००/-  रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला भाव १२,८८०/-  रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. त्याच वेळी, महाराष्ट्रातील इतर मंडईंमध्ये कापसाचा भाव १२,६००/-  रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कायम राहिला आहे.
कापसाला हमीभावापेक्षा अधिक बाजारभाव
कापसाची एकूण गुणवत्ता तपासून पहिली असता गुणवत्तेनुसार, कापसाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव अनुक्रमे ५२२६/-  रुपये आणि ६०२५/- रुपये आहे प्रति क्विंटल एवढा आहे. पण मात्र खुल्या बाजारात कापसाचा भाव १२,०००/-  हजार रुपयांच्या वरतिचं कायम आहे. अशाप्रकारे,  एमएसपी (MSP) आणि बाजारभाव यामध्ये दुपटीचा फरक  निर्माण झालेला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला कापुस एमएसपीवर विकण्याऐवजी व्यापाऱ्यांना बाजारात विकली, त्यांना त्यातून चांगला नफा झाला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती, त्यांना देखील कापसाच्या बाजार भाव वाढीचा फायदा होतं आहे.
भविष्यातील कापसाचे दर
सध्या तरी कापसाचे भाव तेजीत बघायला मिळाले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कापसाच्या भावात घट होण्याची शक्यता फारच कमी आहे. कापूस साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, सध्या तरी कापसाचे भाव चढेच राहणार आहेत.
शेतकऱ्यांकडून साठवणूक  
विदर्भातील काही जिल्ह्यात यावर्षी सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झालेले असून मिळणारा दर समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही मोठ्या प्रमाणात साठवणूक केली आहे. त्यामुळे बाजारात कापसाची सरासरी आवक सुरू आहे. जिनिंगवर जरी कापसाचे दर तेजीत असले तरी ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांना जिनिंगवरील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली आहे. दरम्यान चालू आठवड्यात येथील बाजार समितीत कापसाची आवक सरासरी दररोज तीन हजार क्विंटलवर स्थिर राहीलेली असल्याचे दिसून आलेले आहे. 
(लेखक जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठ नागपूर येथे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत )