केंद्रीय अर्थसंकल्प: २०२३ एक दृष्टीक्षेप डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९ ईमेल : smitarajan76@gmail.com बॉक्स आज भारतीय अर्थव्यवस्था ही योग्य वळणावर असून अनेक नकारात्मक परिस्थिती आजूबाजूला असतानाही भारताने गाठलेले हे यश निश्चितच समाधानकारक आहे असे समजायला हरकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आणि तिच्या महत्वपूर्ण आशा गाभाभूत क्षेत्रासाठी हा आव्हानांचा काळ असूनही भारतीय अर्थव्यवस्था ही आज घडीला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे ही निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेची ग्वाही देत आहे हे दिसून येते. लेख निर्मला सीतारमण यांनी सलग सादर केलेला हा पाचवा अर्थसंकल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सादर केलेला भारताचा दहावा अर्थसंकल्प आहे. भारतिय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण जग आर्थिक आघाडीवर मागे येत असतांना भारताने मात्र जागतिक आघाडीवर किमया केलेली दिसून येत आहे. आजच्या स्थितीत संपूर्ण जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे एक उदयमान विकसित अर्थव्यवस्था म्हणून पहाताना दिसून येत आहे. या मागचे कारण असे कि, कोविड जागतिक महामारीच्या निमित्याने संपूर्ण जगाच्या अर्थ...
Posts
चीनच्या लोकसंख्येतील नकारात्मक वाढ आणि भारतिय लोकसंख्या
- Get link
- X
- Other Apps
चीनच्या लोकसंख्येतील नकारात्मक वाढ आणि भारतिय लोकसंख्या डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी: ७६२०८८१७२९ ई-मेल: smitarajan76@gmail.com बॉक्स सन २०२५ नंतर चीनच्या लोकसंख्येतील नकारात्मक वाढीमुळे चीनचा जीडीपी व दरडोई उत्पन्न हे दोन्ही प्रभावित होणार आहे हे चीनमधील पोलिट ब्युरोला आताच कळलेले आहे. आहास्थिती चीनच्या किरकोळ ग्राहकांची तसेच ठोक ग्राहकांची संख्या ही किती प्रमाणात चीनला प्रभावित करू शकेल हे पाहणे आवश्यक आहे. यामुळेच भविष्यात चीनच्या अर्थव्यवस्थेतील ग्राहकांच्या मागणीची कमतरता होईल असा इशारा चिनी अर्थशास्त्रज्ञाने दिलेला आहे लेख चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाला त्यांच्या लोकसंख्या विषयक धोरणात काही बदल अनपेक्षित रित्या होणार आहे. चीननी यापूर्वी आखलेल्या आपल्या लोकसंख्याविषयक धोरणाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या लोकसंख्येत हे बदल घडून येत आहेत. सन २०२५ नंतर चीनच्या एकूण लोकसंख्येत नकारात्मक पद्धतीने त्यात वाढ होईल असा आजच्या परिस्थितीत हा अंदाज दिसून येत आहे. याचाच परिणाम असा होईल कि, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या मागणीची कमतरता दिसून येईल. ...
भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य
- Get link
- X
- Other Apps
भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी – ७६२०८८१७२९ बॉक्स हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा ही स्वच्छ ऊर्जेचा पर्याय मानली जाते. युरेनियममुळे कमी इंधनात जास्त वीज निर्माण होते, त्यामुळे वाहतूक, साठवणूक आणि जमीन वापर यांसारख्या बाबींमध्येही बचत होते. लेख भारत–कॅनडा दरम्यान झालेल्या युरेनियम पुरवठा करारामुळे अणुऊर्जा आणि तिचे धोरणात्मक महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीदरम्यान विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत महत्त्वाचे करार झाले, त्यात युरेनियम पुरवठ्याचा करार विशेष लक्षवेधी ठरला. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार भारतासाठी दीर्घकालीन धोरणात्मक पाऊल मानला जात आहे. युरेनियम का महत्त्वाचे आहे? युरेनियम हे नैसर्गिकरित्या जमिनीत सापडणारे जड धातू आहे. अणुऊर्जा निर्मितीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे इंधन मानले जाते. कोळसा, तेल किंवा नैसर्गिक वायू यांच्या तुलनेत युरेनियमची ऊर्जा घनता खूप जास्त असते. म्हणजेच, अतिशय कमी प्रमाणातील यु...