अलौकीक प्रतिभेचे धनी : स्वामी विवेकानंद
अलौकीक प्रतिभेचे धनी : स्वामी विवेकानंद
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
बॉक्स
या भूतलावावर काळाच्या ओघात अनेक पुरुष जन्माला येतात. यातील काही पुरुष आपल्या कार्यकर्तुत्वानी मोठे होतात. इतिहास सुद्धा त्यांची दखल घेतो. ते इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये थोर पुरुष म्हणून आपले स्थान मिळवतात. काही माणसे आपल्या अलौकिक कार्यांनी इतिहासाचा प्रवाहच बदलवून टाकतात ते इतिहासात महापुरुष म्हणून गणले जातात. परंतु काही माणसे आपल्या दिव्य तेजाने संपूर्ण काळाचाच प्रवाह बदलवून टाकतात, इतिहास त्यांची दखल घेतो. अशी माणसे युगपुरुष म्हणून इतिहासात सदेव प्रेरणा देत राहतात. यातीलच एक युग पुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होत.
लेख
या विश्वाला प्रचंड उर्जा देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारीला १८६३ रोजी प. बंगाल मध्ये कोलकाता येथे झाला. भुवनेश्वरी देवीचे पुत्र असलेल्या व पुढे विश्वलोकपुत्र म्हणून नावारुपास आलेल्या या अलौकिक पुत्राचा शंख वाजवून मंगल ध्वनिनी त्यांचे कुटुंबात स्वागत केले गेले. अशा एका महान व्यक्तिमत्त्वाच्या जन्मामुळे आजही भारतमातेला आपल्या या महान पुत्रावर अभिमान आहे. या मुलाचे लहानपणापासूनच पाळण्यात पाय दिसत होते. या दिव्य अलौकिक मुलाचे रूप पाहून त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त यांच्यासारखे होते. विश्वनाथ दत्त यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलाचे नाव दुर्गाचारण ठेवण्याची ईच्छा व्यक्त केलेली होती , परंतु आईने पाहिलेल्या स्वप्नावर आधारित मुलाचे नाव विशवेश्वर ठेवण्यात आले. लोक त्यांना प्रेमाने 'पित्त' म्हणून संबोधत असत. हिंदू मान्यतेनुसार मुलांची दोन नावे ठेवण्यात आलीत, एक राशीनुसार आणि दुसरे सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी एक सामान्य नाव आणि ठेवण्यात आले. बाळाच्या अन्नप्राशनच्या शुभ मुहूर्तावर मुलाचे नाव नरेंद्रनाथ ठेवण्यात आले. छोट्या नरेंद्राची बुद्धिमत्ता लहानपणापासूनच अत्यंत तीक्ष्ण होती. आपल्या बालपणी नरेंद्र खूप खोडकर होते. त्यांनी आपला खोडकरपणा कमी करावा म्हणून त्यांना ब-याचदा त्यांना भीती दाखविली जायची. कधी कधी त्यांना आईला डटावावे लागायचे किंवा धमकावावे लागायचे. परंतु या गोष्टीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. नरेंद्रच्या या खोडकरपणावरती आई भुवनेश्वरी देवीने एक आश्चर्यकारक उपाय करण्याचा विचार केला, जेव्हा नरेंद्र असभ्य वागणूक करायचा तेव्हा ती शिव-शिव म्हणत त्याच्यावर पाणी टाकत होत्या. आईच्या या कृतीमुळे बाळ नरेंद्र खूप शांत झाला . आई भुवनेश्वरी असे वाटायला लागले की हे मूल नरेंद्र शिवाचे रूप तर नाही ना अशी शंका यायला लागली . लहानपणी आपल्या मुलावरती चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना आईच्या तोंडून रामायण - महाभारताच्या कथा ऐकवल्या जात असत. त्यांना ह्या गोष्टी बालपणी आवडायच्या सुद्धा, याबरोबरच लहानपणी नरेंद्रनाथ यांना ट्रेनमध्ये फिरणे अत्यंत आवडायचे. जेव्हा त्याना कोणी विचारले की, तू मोठा झाल्यावर काय बनने आवडेल ? तेव्हा ते म्हणायचे की मी मोठा झाल्यावर शिक्षक होईल.
परंतु ईकडे पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे वडील विश्वनाथ दत्त यांना आपल्या या लाडक्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन पाश्चात्य सभ्यतेत रंगवायचे होते. पण नियतीने काही खास हेतूनेच या धरतीवर या मुलाला जन्म दिलेला होता असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला जागतिक ओळख कोणी दिली असेल तर ते नरेंद्र दत्त उर्फ स्वामी विवेकानंद होते. जर कोणाला जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीला नवी ओळख देण्याचे श्रेय जात असेल तर ते स्वामी विवेकानंद आहेत. नरेंद्र यांना व्यायाम, कुस्ती, क्रिकेट इत्यादींमध्ये विशेष रस होता. कधीकधी ते मित्रांसह विनोदांमध्ये सुद्धा भाग घेत असत. नरेंद्र दत्त बद्दल एकदा जनरल असेंब्ली कॉलेजचे अध्यक्ष मुगलम हस्ती म्हणाले होते की, नरेंद्रनाथ हा तत्वज्ञानाचा एक उत्कृष्ट विद्यार्थी असून त्याच्या सारखा मेधावी छात्र. जर्मनी आणि इंग्लंडमधील सर्व विद्यापीठांमध्ये सुद्धा नाही. माझ्या पाहण्यात नरेंद्रनाथांसारखे गुणवंत विद्यार्थी कुठेही दिसून आलेले नाहीत. नरेंद्राच्या व्यक्तीमत्वात जे काही महान आहे ते त्याच्यावर झालेल्या सुसंस्कार आणि त्याच्या सुशिक्षित आणि विचारवंत आईच्या शिक्षणाचा हा परिणाम आहे. त्याच्यात लहानपणापासूनच दैवीशक्ती व उर्जा आणि अलौकिक ज्ञान मिळण्याची इच्छा निर्माण झालेली होती. नरेंद्रनाथ यांच्या वरती अध्यात्म व तत्वज्ञान यांचा खूपच प्रभाव होता. सुरुवातीची नास्तिक प्रवती व नंतरचा बदल सोडला तर त्यांच्या कुशाग्र बुध्धीमत्तेवर डेकार्टचा अहंकारवाद, डार्विनचा उत्क्रांतीवाद, व हर्बट स्पेंसरचा एकेश्वरवाद यांचा विशेष प्रभाव होता. या सर्व विषयावरील अलौकिक ज्ञान ऐकल्यावर नरेंद्रनाथ अंतिम सत्य व त्याच शोध घेण्यास ते उत्सुक झालेले होते. आपला अंतिम ध्येय काय आहे याचा त्याना अजूनही शोध लागलेला नव्हता. ते आपले जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते ब्राम्हो समाज येथे गेले, परंतु तेथे सुद्धा त्यांचे मन शांत झालेले नव्हते. परंतु एकदा रामकृष्ण परमहंसांची स्तुती ऐकून नरेंद्र अंतिम तर्कांच्या शोधासाठी एका विशिष्ट उद्देशाने त्यांच्याकडे गेले. रामकृष्ण परमहंसांच्या विचारांनी ते अत्यंत प्रभावित झालेले होते. याचवेळी त्यांना नरेन्द्रनाथानी त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. परमहंसांच्या कृपेने त्याने स्वत: मां काली यांचे दर्शन झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रिय शिष्यांमध्ये नरेंद्र हे सर्वोपरि होते. अगदी वयाच्या २५ व्या वर्षी नरेंद्र यांनी भगवी वस्त्र परिधान करुन सन्यास घेतला आणि अंतिम सत्याच्या शोधासाठी निघाले.सन १८९३ मध्ये ते शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले, पण त्यावेळी युरोपमधील भारतीयांच्या निकृष्ट मनोवृत्तीचे दर्शन झाले. अनेकांनी त्याना रोखण्याचे अनेक प्रयत्न केलेत. या प्रदिप्तमान उगवत्या सूर्याला रोखण्याचे मात्र कोणामध्येही सामर्थ्य नव्हते. यानिमित्याने अमेरिकेतील एका प्राध्यापकाने प्रामाणिक प्रयत्न करून स्वामीजींना या जागतिक धर्मसंसदेत बोलण्याची संधी मिळाली. स्वामीजीनी उपस्थित श्रोत्याना माझ्या बहिण आणि भावानो म्हणून संबोधित केले. स्वामीजींच्या तोंडून हे शब्द उपस्थित श्रोत्यांनी ऐकून त्यांचे प्रचंड टाळ्याच्या कडकडाटासह त्यांचे स्वागत मोठ्या आवाजात करण्यात आले. प्रेक्षक त्यांचे भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले आणि त्याना दिलेली वेळ केव्हा संपली हे ठाऊक सुद्धा झाले नाही पुढे स्पीकर गिब्न्सच्या विनंतीनुसार स्वामीजी पुढे बोलू लागले आणि २० मिनिटांपेक्षा जास्त काळ ते बोलट राहिले. स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक भाषणामुळे यातील अनेक श्रोते विस्मित होऊन त्यांचे शिष्य बनले. पुढे पुढे तर अनेक ठिकाणी अशी एकच गोष्ट घडायची अशी की जेव्हा जेव्हा श्रोतासभेत गोंधळ होऊन अनेक गोंगाट व आवाज ऐकू येत असे तेव्हा त्यांना स्वामीजींचे भाषण ऐकवायचे आमिष दाखवले जात असे व संपूर्ण जनता गप्प बसायची. हे नित्याचेच झालेले होते.स्वामीजींनी आपल्या व्याख्यानातून हे सिद्ध केले होते की हिंदू धर्म हा संपूर्ण विश्वात सर्व श्रेष्ठ आहे, त्यात सर्व धर्म व त्याच्या तत्वांना आपल्यात समाविष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. हिंदू धर्माच्या या सर्वसमावेशकतेमुळे व आपल्या मधुर वाणीने या आश्चर्यकारक रीतीने या सन्यासी माणसाने साता समुद्रापार भारतीय संस्कृतीचा झेंडा पसरविला. या जागतिक दिग्विजयाचा सुगंध अजूनही संपूर्ण विश्वभर दरवळत आहे. या भूतलावावर काळाच्या ओघात अनेक पुरुष जन्माला येतात. यातील काही पुरुष आपल्या कार्यकर्तुत्वानी मोठे होतात. इतिहास सुद्धा त्यांची दखल घेतो. ते इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये थोर पुरुष म्हणून आपले स्थान मिळवतात. काही माणसे आपल्या अलौकिक कार्यांनी इतिहासाचा प्रवाहच बदलवून टाकतात ते इतिहासात महापुरुष म्हणून गणले जातात. परंतु काही माणसे आपल्या दिव्य तेजाने संपूर्ण काळाचाच प्रवाह बदलवून टाकतात, इतिहास त्यांची दखल घेतो. अशी माणसे युगपुरुष म्हणून इतिहासात सदेव प्रेरणा देत राहतात. यातीलच एक युग पुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होत.
स्वामीजी हे केवळ संन्यासी संतच नव्हते तर एक सच्चे देशभक्त, सुप्रसिध्द वक्ते, चिंतनशील विचारवंत, लेखक आणि मानवतावडी होते. दारिद्रीनारायानाची सेवा हीच मानवसेवा आहे असे त्यांचे अभिवचन होते. होते. १९०२ मध्ये कोलकातामध्ये अस्वास्थ्यानी पीडित असूनही स्वामीजींचे अलौकिक कार्य सुरूच होते. स्वामीजींनी या काळातही तनमनाने साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करून मानवतेचे एक उत्तम उदाहरण उभे करून दिले. स्वामी विवेकानंद यांनी १ मे १८९० रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनद्वारा समाजातील इतरांची सेवा आणि परोपकार यालाच कर्मयोग मानतात. स्वामीजींनी ३९ वर्षांच्या आपल्या छोट्या आयुष्यात केलेली हि अद्भुत कार्ये आगामीकाळात पिढ्यांनी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील हाच आशावाद आहे. या महान विभूतीचे अंतिम कार्य संपून त्यांनी आपला देह ४ जुलै १९०२ रोजी या धर्तीवर ठेऊन अनंताच्या प्रवासाला निघालेत. स्वामीजींचे अलौकिक शरीर परमात्म्यामध्ये विलीन झाले.
( लेखक जीवन विकास महाविद्यालय देवग्राम येथे उपप्राचार्य असुन रा तु म नागपुर विद्यापिठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत)