चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरण आणि वस्तुस्थिती डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१ ईमेल : smitarajan76@gmail.com
चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरण आणि वस्तुस्थिती
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
ईमेल : smitarajan76@gmail.com
बॉक्स
आज घडीला आंतरराष्ट्रीय वातावरणातील सध्याची चीनच्या अर्थव्यवस्थेची अनिश्चितता दिवसेंदिवस अधिक वाढत असून देशांतर्गत आर्थिक सुधारणा अजूनही अस्थिर आणि असमान असल्याचे दिसून येत आहे. हा चीनच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा धक्काच आहे.
लेख
कोविड काळातही ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेणी आश्चर्यकारक आर्थिक वाढ नोंदवली होती त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत चीनची अर्थव्यवस्था अग्रक्रमावर होती. अशा मोजक्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनच्या खूप मोठा वाटा होता. चीनच्या अर्थव्यवस्थेनी तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी ४.९% टक्क्यांनी वाढलेला होता तर दुसऱ्या तिमाही मध्ये तो ७.९% टक्क्यांनी खाली आलेला होता. याच कारणांमुळे अत्यंत संकटग्रस्त मालमत्ता क्षेत्राच्या दबावाखाली असलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक मंदीची पुष्टी झालेली दिसून आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत चीनने कधीही विश्वासार्ह आकडेवारी जगासमोर येवू दिलेली नाही. यामुळे चीनच्या आर्थिक विकासाच्या दरावर जगानी कधीही विश्वास ठेवलेला नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत त्याचे सकल देशांतर्गत उत्पादन दरवर्षी ४.९% टक्केनी वाढलेले दिसून आले. यात विशेष म्हणजे पहिल्या जे क्यु १ मध्ये १८.३% टक्के ऐवढी आश्चर्यकारक वाढ नोंदविली गेली होती. याबरोबरच क्यु २ मध्ये ७.९% टक्के वाढीपेक्षा कमी दरानी वाढ झालेली दिसून आली. परंतु क्यु ३ ने चीनच्या अर्थव्यवस्थेत ५% टक्के वाढ घडून येईल असा अंदाज वर्तवलेल्या सर्वेक्षणाला खोटे ठरवले गेले. यात विशेष म्हणजे क्यु ३ ची आकडेवारी जाहीर करताना, नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिक्स (एनबीएस) चे प्रवक्ते फू लिंग हुई यांचे मत तपासून पहिले असता त्याची सत्यता पडताळून पाहता येते. चालू आर्थिक वर्ष २०२१ – २०२२ च्या पहिल्या तीन तिमाहीत चीनच्या आर्थिक वाढीमध्ये उपभोग क्षेत्राने सुमारे ६४.८% टक्के योगदान दिलेले दिसून आले. आज घडीला आंतरराष्ट्रीय वातावरणातील सध्याची चीनच्या अर्थव्यवस्थेची अनिश्चितता दिवसेंदिवस अधिक वाढत असून देशांतर्गत आर्थिक सुधारणा अजूनही अस्थिर आणि असमान असल्याचे दिसून येत आहे. हा चीनच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा धक्काच आहे. चीनच्या संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तीन तिमाहीत पुनर्प्राप्तीचा वेग कायम ठेवलेला आहे. या संदर्भातील हाँगकाँग-आधारित फू च्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनच्या ग्राहकोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री या वर्षी पहिल्या तीन तिमाहीत वर्षभरात १६.४% टक्क्यांनी वाढलेली दिसून आलेली आहे. हांगकोंग पोस्टच्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत देशातील ग्राहक वस्तूंची किरकोळ विक्री सुमारे ३१.८ ट्रिलियन युआन म्हणजेच सुमारे ४.९ ट्रिलियन डॉलर ऐवढी झालेली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या पहिल्या तीन तिमाहीत चीनचे मूल्यवर्धित औद्योगिक उत्पादन दरवर्षी ११.८ टक्क्यांनी वाढलेले दिसून आले आहे, तर या कालावधीत स्थिर मालमत्ता गुंतवणूक ही ७.३% टक्क्यांनी वाढलेली आहे. चीनच्या घरेलू क्षेत्रात सर्वेक्षण केलेल्या शहरी बेरोजगारीचा दर हा सप्टेंबरमध्ये ४.९% टक्के होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.५% टक्के कमी आहे. एनबीएसच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चीनने पहिल्या तीन तिमाहीत १०.४५ दशलक्ष नवीन शहरी नोकऱ्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण केलेला असून त्यांनी आपल्या एकूण उदीष्टाच्या ९५% टक्के ऐवढे उद्दिष्ट साध्य केले गेले असल्याचे दिसून आले. आज चीनच्या अर्थव्यवस्थेची ही घसरण सुरु झालेली असून ती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आलेले आहे. या संदर्भात चीनच्या अर्थव्यवस्थेच्या घसरत्या प्रवृत्तीची कबुली देत, ग्लोबल टाइम्सने क्यु ३ च्या आकडेवारीच्या अहवालात स्पष्ट म्हटलेले आहे की, तिसऱ्या तिमाहीत चीनची आर्थिक मंदी गेल्या वर्षीच्या मुलभूत कमी प्रभावामुळेच दिसून आली नाही. आजघडीला संपूर्ण जगात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणावर नियंत्रित झालेली दिसून येत आहे तेव्हा चीनला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने जसे की विजेचा तुटवडा आणि पुरवठा साखळी यात प्रचंड समस्या निर्माण होतांना दिसून येत आहेत. आधीच अनेक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी चीनच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी मध्ये होणारी संभाव्य वाढ कमी केलेली आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने पूर आणि नियामक तत्वांच्या निकषांच्या रेंगाळलेल्या कठोर परिणामांवर आधारित चीनच्या तिसऱ्या तिमाहीच्या जीडीपीचा अंदाज ६% टक्क्यांवरून ५% टक्क्यांवर आणलेला दिसून येत आहे. गोल्डमॅन सॅक्सने चीनच्या चौथ्या तिमाहीत जीडीपी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ३.२% टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता, जो मागील ४.१% टक्क्यांच्या अंदाजानुसार होता. ग्लोबल टाइम्सने रेटिंग एजन्सी मूडीजच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, चीनच्या वीज कपातीमुळे देशाच्या आर्थिक ताणात अधिक भर पडलेली असून त्याचे दीर्घकालीन परिणाम हे २०२२ - २०२३ साठी त्याच्या जीडीपी वाढीवर अधिक भार पडून खाली घसरेल असा अंदाज आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चीनच्या उत्पादन आणि पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे भविष्यातील जीडीपीच्या अंदाजासाठी त्याचे धोके मोठे असू शकतात. चेसिंग सिक्युरिटीजचे मुख्य अर्थतज्ज्ञ वू चाओमिंग यांनी ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखातीनुसार चीनच्या तिसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढ काही अंशी चिनी प्रांतांमध्ये कोरोना व्हायरसच्या पुनरुत्थानामुळे आणि काही अंशी मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या किंमती आणि वीज पुरवठा निर्बंधांच्या वाढीमुळे कमी झालेली आहे. याच कारणांमुळे डाउनस्ट्रीम औद्योगिक उपक्रमांच्या नफ्यावर थेट नकारात्मक परिणाम झालेला आहे. चीनच्या जीडीपीतील ४.९% टक्के जीडीपी वाढ ही अजूनही ५.५% ते ६.० % टक्क्यांच्या संभाव्य वाढीच्या दराच्या जवळ आहे. याचाच अर्थ देशाची आर्थिक वाढ अजूनही सामान्य श्रेणीमध्येच असणार आहे. यासंदर्भातील अर्थतज्ञांनी चौथ्या तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीला अतिरिक्त दबावाचा जबरदस्त सामना करावा लागेल, जे संपूर्ण २०२१ पर्यंत चीनच्या जीडीपी वाढीला आणखी खाली आणू शकते. चीनचे अर्थशास्त्रज्ञ वू यांच्या मते, आता सर्वात मोठे आव्हान गुंतवणूक क्षेत्रासमोर असणार आहे. बँकांच्या गृह कर्जाच्या आवश्यकता तसेच एव्हरग्रॅण्ड कर्जाच्या संकटामुळे मालमत्ता बाजारासाठी बाजारातील अपेक्षा कमी होत आहेत. एव्हर्ग्रांडच्या नुसार चीनची सर्वात मोठी मालमत्ता कंपनी समोर अलिकडच्या आठवड्यात एक मोठे आर्थिक संकट निर्माण केलेले आहे. त्यांनी यात ३०९ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचे हप्ते चुकवण्यास सुरुवात केलेली असून अनेक चिनी प्रांतांनी कोळशाच्या कमतरतेमुळे तीव्र वीज संकटाचा सामना करावा लागेल असा अहवाल दिलेला असून ही भविष्यातील चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीची सुरुवात आहे.
(लेखक रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य असून ते जीवन विकास पदवी महाविद्यालय देवग्राम येथे उपप्राचार्य आहेत )