भारत – ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय व्यापार करार : नव्या आर्थिक संधी आणि भविष्यातील लाभ

भारत – ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय व्यापार करार : नव्या आर्थिक संधी आणि भविष्यातील लाभ
डॉ.राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
ईमेल :smitarajan76@gmail.com
बॉक्स
या करारावरील स्वाक्षरीमुळे, कापड, चामडे, फर्निचर, दागिने आणि यंत्रसामग्रीसह ६,००० हून अधिक क्षेत्रांतील भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत त्वरित शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. या इतिहास घडविणाऱ्या कराराचे भारत-ऑस्ट्रेलिया हे भागीदार देश आहेत. हे दोन्ही देश प्रगल्भ लोकशाही, संविधानावर आधारित कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता या तीन सामायिक मूल्यांनी हे एकत्र आल्याचे दिसून आलेले आहे.
लेख
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापारविषयक करारावर नुकत्याच उभय देशांच्या बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार दोन्ही देशांसाठी अत्यंत लाभदायक करार असल्याचा दावा करण्यात येत असून यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या ९६ टक्के वस्तूंवर आता ऑस्ट्रेलियात शुन्य कर आकारणी होईल. हीच या मुक्त व्यापार कराराच्या निमित्याने दोन्ही देशांसाठी सर्वात मोठी उपलब्धी ठरू शकेल. यात अभियांत्रिकी वस्तू, दागदागिने आणि जडजवाहिर, वस्त्रे, चामडय़ाच्या वस्तू आदींसारख्या वस्तूंचा यात समावेश करण्यात आलेला आहे. यातून दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवा पुरवठादारांना उत्तेजन मिळणार आहे. पाच वर्षांत ही उलाढाल ४५०० ते ५००० कोटी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. सध्या ही आर्थिक, व्यापारीक उलाढाल २७०० कोटी डॉलर इतकी आहे. यातून सध्यातरी भारतात १० लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत असे भारत सरकारच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालेले दिसून येत आहे. या करारानुसार आयातशुल्क माफीची योजना ही येणाऱ्या पाच वर्षांत शंभर टक्के भारतीय वस्तूंसाठी लागू केली जाणार आहे. गेल्या दशकभरात प्रमुख विकसित देशाबरोबर भारताने केलेला हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे. यात कराराच्या संदर्भात भारताचे व्यापार आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल तथा ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॅन टेहनन यांनी एका आभासी समारंभात या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन दोघेही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक असून दोन्ही देशांमधील व्यापारिक,आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर टाकलेले सर्वात मोठे पाउल आहे अशी आंतरराष्ट्रीय जगतात चर्चा आहे. सामरिक शक्ती व इतरही दृष्टीने सहकार्यासाठी भविष्यात त्यात विस्तार केला जाऊ शकतो असे यासंदर्भात वाटत आहे. याच दृष्टीकोनातून आर्थिक सहकार्य व व्यापार विषयक करार केलेला आहे. या व्यापारविषयक कराराच्या माध्यमातून भारताच्या वस्त्रउद्योगाला अधिक उत्तेजन मिळणार असून चामड्याच्या वस्तू, दागदागिने आणि क्रीडाउत्पादनांना ऑस्ट्रेलियात निःशुल्क प्रवेश मिळणार आहे. भारताचे अत्यंत कार्यकुशल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल व ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन टेहान यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे हा क्षण दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा क्षण असल्याचे अनेक अर्थतज्ञांनी म्हटलेले आहे. या व्यापार कराराच्या निमित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियातील त्यांचे समकक्ष स्कॉट मॉरिसन का सुवर्ण कराराचे सर्व साक्षी होते. या करारामुळे एक गोष्ट साध्य केली जाणार असून या निमित्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध अधिक बळकट होतील असे सध्यातरी वाटत आहे..
 भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय करार
या द्विपक्षीय करारामुळे पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार २७ अब्ज डॉलर्सवरून ४५ ते ५० अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असाच एकूण अंदाज आहे. या कराराच्या निमित्याने पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलिया भारताला जवळपास ९६.४% टक्के निर्यातीसासाठी शून्य शुल्काची सवलत देत आहे. सध्या चार ते पाच टक्के कर आकारणी केल्या जाणार्‍या कित्येक उत्पादनांचा यात समावेश असून यामुळे त्याचे लाभ या जुन्या यादीतील उत्पादनास सुध्दा होतील. यामुळे भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला एक नवी संधी प्राप्त झालेली आहे.
श्रमिक क्षेत्राला होणार फायदा
भारत ऑस्ट्रेलिया परस्पर व्यापार कराराच्या निमित्याने आपल्या देशातील श्रमिक क्षेत्राला याचा भरपूर फायदा होणार आहे. दोन्ही देशांच्या श्रमिक कौशल्याच्या संधीचे लाभ उभय राष्ट्रांना प्राप्त होऊन नव सहयोगातून नव्या संधींचा शोध घेतला जाणार आहे. या क्षेत्रातील सुती व रेशमी वस्त्रे आणि विविध पोशाख, काही कृषी आणि मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडा वस्तू, दागदागिने, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल वस्तू आणि रेल्वेच्या वाघिणींची ऑस्ट्रेलिया मध्ये खुली निशुःल्क निर्यात केली जाणार असून असून याचे लाभ दोन्ही देशांना होणार आहेत.
 विद्यार्थी, व्यावसायिक, पर्यटकांना फायदा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या परस्पर व्यापार कराराच्या निमित्याने दोन्ही देशांना यातून निर्माण होणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास मदत मिळणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय विद्यार्थी जे परदेशात त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात अशा विद्यार्थी वर्ग, तसेच विविध व्यावसायिक व पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची देवाणघेवाण करण्यास या माध्यमातून अधिक सुलभ होईल. ज्यामुळे याचे लाभ दोन्ही देशातील या क्षेत्रामुळे परस्पराना सामंजस्य करार आपापसात करता येईल.
भारत-ऑस्ट्रेलियाची 'अंतरिम' व्यापार करारावर स्वाक्षरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी होणे म्हणजे उभय देशातील द्विपक्षीय संबंधांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी झाली आहे. या करारावरील स्वाक्षरीमुळे, कापड, चामडे, फर्निचर, दागिने आणि यंत्रसामग्रीसह ६,००० हून अधिक क्षेत्रांतील भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत त्वरित शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. या इतिहास घडविणाऱ्या कराराचे भारत-ऑस्ट्रेलिया हे भागीदार देश आहेत. हे दोन्ही देश प्रगल्भ लोकशाही, संविधानावर आधारित कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता या तीन सामायिक मूल्यांनी हे एकत्र आल्याचे दिसून आलेले आहे. या दोन्ही देशांनी कोविडच्या जागतिक महामारीत यादोन्ही राष्ट्रांनीही एकमेकांना अत्यंत मोलाची साथ दिलेली होती. यामुळेच हे दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक मित्र आहेत. 'हे परस्पर दोन संबंध भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, या करारामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांची देवाणघेवाण सुलभ होऊ शकते आणि त्यामुळेच दोन्हीं देशांमधील संबंध आणखी घट्ट होतील.
द्विपक्षीय संबंधांसाठी खरोखरच एक ऐतिहासिक क्षण,
या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल बोलताना सांगितले की, 'एवढ्या कमी वेळेत एवढ्या महत्त्वाच्या करारावर दोन्ही देशांमध्ये किती परस्पर विश्वास आहे, हे सहज दिसून येते. आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हा खरोखर ऐतिहासिक क्षण झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध हा मैत्रीचा आधारस्तंभ असल्याचे ते यावेळी म्हणाले. या करारामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यातील देवाणघेवाण सुलभ होऊ शकतो आणि संबंध ही अधिक घट्ट होतील.
अनेक वस्तू भारतीय निर्यातदारांसाठी शून्य आयात शुल्कावर उपलब्ध असणार,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे.या करारास आता केंद्रीय मंत्रिमंडळ आणि ऑस्ट्रेलियाच्या संसदेकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर हा करार परस्पर तारखेला लागू होणार आहे. यासंदर्भातील महत्वाचे दुवे असणाऱ्या सूत्रांच्या अहवालानुसार हा अंतरिम करार अंमलात येण्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय निर्यातदारांना शून्य आयात शुल्कावर अनेक वस्तू उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासूनच भारताला निर्यातीच्या मूल्याच्या सुमारे ९६.४% टक्के शून्य शुल्क देऊ करत आहे. यामध्ये सध्या ऑस्ट्रेलियामध्ये चार ते पाच टक्के सीमाशुल्क आकारणाऱ्या अनेक उत्पादनांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे भारत आपल्या 'टेरिफ लाइन'च्या ७० टक्क्यांहून अधिक उत्पादनांना ऑस्ट्रेलियासाठी शून्य शुल्क ऑफर करणार आहे. यामध्ये कोळशासारख्या उत्पादनांचा देखील समावेश असेल अशी दाट शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतून होणाऱ्या कोळशांच्या एकूण आयातीपैंकी ७४ टक्के कोळशाचा वाटा हा एकट्या ऑस्ट्रेलियाचा रहाणार आहे तर सध्या त्यावर २.५% टक्के शुल्क आकारले जाते आहे. हे शुल्क आता नष्ट केले जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य व्यापार करार भारत ९५% टक्के उत्पादन निःशुल्क प्रवेश दोन्ही देशात दिल्या जाणार आहे.
भारत-ऑस्ट्रलिया' करार: 10 लाख रोजगाराच्या नव्या संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान या कराराच्या निमित्याने व्यापार वृद्धी आणि आर्थिक सहकार्यासंदर्भात या करारानुसार ऑस्ट्रलियन सरकार भारतीय उत्पादनांना कर आकारणीशिवाय (Free Trade Deal) आपल्या देशातील संपूर्ण बाजारपेठा उपलब्ध करुन देणार आहे. यात भारतातील पारंपारिक उत्पादनातील वस्त्रोद्योग, कातडी उद्योग तसेच दाग-दागिणे आणि क्रिडासाहित्य, ईलेक्ट्रिक वस्तू, फूटवेअर, फर्निचर, शेती उत्पादनांचा समावेश असणार आहे. या करारामुळे येत्या चार ते पाच वर्षात भारतात १० लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. यातही योगा प्रशिक्षक आणि भारतीय शेफना ऑस्ट्रेलियन आरोग्य, क्रीडा व हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या संधी असणार आहेत. भारताबरोबरचा ऑस्ट्रेलियानी केलेला हा व्यापारविषयक करार म्हणजे जगाला एका मोठ्या बाजारपेठेचं दार खुलं करणार असेल्याचेच हे संकेत आहेत. आतापर्यंत दोन्हा देशांमध्ये २७ अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यापार होता, या करारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ दोन्ही देशांना होऊन हा व्यापार विषयक व्यवहार ४५ ते ५० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचेल असा विश्वास आहे. येत्या काळात ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच निवडणुका असणार आहेत. त्यामुळे अनेर वर्षांपासून रखडलेला फ्रि ट्रेड डिल चा करार आता आता पूर्णत्वास गेलेला आहे. यापूर्वी चीनच्या बाजारपेठेवर ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. परंतु आता या करारामुळे भारतीय बाजारपेठ ऑस्ट्रलियासाठी महत्वाची मानली जात असून यात पुन्हा पुन्हा नवनव्या आर्थिक व व्यापारविषयक संधी निर्माण होणार आहेत.
(लेखक जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे पदवी महाविद्यालयाला उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत )

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय