चीनी अर्थव्यवस्था : चीनच्या जीडीपीची मंद गती आणि आर्थिक विकासाला अवरोध
चीनी अर्थव्यवस्था : चीनच्या जीडीपीची मंद गती आणि आर्थिक विकासाला अवरोध
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
ईमेल : smitarajan76@gmail.com
बॉक्स:
गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात मालमत्ता बाजारातील घसरण आणि नियामक क्रॅकडाउनसह जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील होणारी आर्थिक वाढ आधीच मंदावलेली होती, ज्यामुळे चीन मधील आर्थिक धोरण कर्त्यांनी २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षासाठी या दशकांमधील त्यांच्या सर्वात कमी वार्षिक GDP चे लक्ष्य सेट केलेले असल्याचे दिसून येत आहे.
लेख:
सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक आर्थिक संकटाचे ढग दाटून आलेले दिसून येत आहेत. कोविडच्या दोन वर्षाच्या काळात जगातील अनेक विकसित व अविकसित अर्थव्यवस्थांना धक्का देत पुढे जात वेगाने मार्गक्रमण करीत होती. परंतु चीनच्या धूर्त चालीची जाणीव अनेक देशांना झाली . परिणामत: चीन मधून केली जाणारी मोठ्या प्रमाणातील निर्यात प्रभावित झाली. परिणामत: जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला सुध्दा बसला. याचाच परिणाम असा झाला की, देशाची अर्थव्यवस्था व आर्थिक विकासाचा दर म्हणजेच जीडीपी मध्ये मंद गतीने वाढ होऊन आर्थिक विकासाचा वेग घसरलेला दिसून आला. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी सारख्या वित्तीय संस्था जेव्हा भारताचा आर्थिक विकास दर याकाळात १०.५% च्या आसपास राहील अशी शक्यता वर्तवित असतांना चीनच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हा ४.५% च्या दराने होईल याचे अंदाज वर्तविले जात होते. मधल्या काळात हा रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो जवळपास २ टक्क्यांनी घटवून तो ८.५% च्या दरानी आर्थिक विकास होईल अशाही शक्यता वर्तविल्या गेल्यात. गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात मालमत्ता बाजारातील घसरण आणि नियामक क्रॅकडाउनसह जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील होणारी आर्थिक वाढ आधीच मंदावलेली होती, ज्यामुळे चीन मधील आर्थिक धोरण कर्त्यांनी २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षासाठी या दशकांमधील त्यांच्या सर्वात कमी वार्षिक GDP चे लक्ष्य सेट केलेले असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या शून्य - कोविड धोरणाच्या वाढत्या खर्चामुळे बीजिंगचे महत्त्वाकांक्षी जीडीपीचे लक्ष्य रुळावरून घसरण्याची भीती यानिमित्याने व्यक्त केलेली आहे. या संदर्भात आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे असे आहे की, जागतिक पुरवठा साखळी घसरल्याने मालाची आयात निर्यात करण्यास बंदरांना विलंब होत आहे. जागतिक व्यापार केंद्र असलेले शांघाय लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहे. परंतु चीनमधील आर्थिक विश्लेषकांनी एएफपीला दिलेल्या अहवालात असे सांगितलेले आहे की, ५.५ टक्के हा आकडा स्टे – अॅट – होमच्या ऑर्डरमुळे निश्चित करावा लागलेला असून सध्या त्याची परिणीती ही उत्पादन थांबविणे आणि प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांचा खर्च कमी करणे कठीण झालेले असल्याचे दिसून आलेले आहे. नुकत्याच AFP द्वारे सर्वेक्षण केलेल्या १२ वित्तीय संस्थांमधील तज्ञांनी संपूर्ण २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षासाठी ५.०% टक्के GDP वाढीचा अंदाज वर्तवलेला आहे. सध्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४.३% टक्के या विकास दराने आर्थिक विकास होईल असे अपेक्षित आहे. जे तीन महिन्यांपूर्वी नोंदवलेल्या ४.० % टक्क्यांच्या वर आहे. "चीनच्या अर्थव्यवस्थेने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कमी ऊर्जेची मर्यादा, देशांतर्गत मागणी व आर्थिक पुनर्प्राप्ती व त्यातील तुट, वित्तीय उत्तेजन आणि लवचिक निर्यातीसह चांगली सुरुवात केलेली आहे. "बऱ्याचदा चीनमधील कोणतीही अधिकृत सत्य माहिती बाहेर येत नाही. चीन नी दिलेली कोणतीही माहिती विश्वासार्ह नसताना सुध्दा त्यावर विश्वास ठेवावा लागतो. चीनच्या अर्थव्यवस्थेचे कोणतेही सांख्यिकीय स्त्रोत सत्य नाहीत. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्समधील चीन संशोधनाचे प्रमुख जीन मा यांचे या संदर्भातील मत विश्वासार्ह मानावे लागेल. परंतु मार्च २०२२ मधील पुन्हा कोविद्ची आलेली लाट आणि वाढत्या विषाणूची प्रकरणे आणि लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा "पुरवठा साखळी आणि औद्योगिक क्रियाकलाप गंभीरपणे विस्कळीत झालेले आहेत". या संदर्भातील आर्थिक विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवलेला आहे की, कोरोना व्हायरसचा उद्रेक हा या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या नफ्याला उलटफेर करेल. या चालू आठवड्यात चीनमधील कार निर्मात्यांनी जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये गंभीर व्यत्यय येण्याचा इशारा दिलेला आहे. सध्यातरी चीन मधील व्यवसाय हब हे शांघायमध्ये असेच लॉकडाउन सुरू राहिल्यास, उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. प्रीमियर ली केकियांग यांनी या आठवड्यात अधिकची काळजी घेवून उत्पादन सुरु ठेवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील लॉकडाऊन विरोधात समर्थन वाढवने आवश्यक असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. यात विशेष करून कोरोना व्हायरस-ग्रस्त क्षेत्रांना आर्थिक मदत करण्यासाठी तेथील व्यापारी व औद्योगिक बँकांसाठी राखीव आवश्यकता प्रमाण कमी करण्यासह साधनांचा वापर केला जाऊ शकतो असा तूर्तास तरी अंदाज दिसून येत आहे. चीनमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या इतर प्रमुख शहरांमध्ये दक्षिणेकडील टेक पॉवरहाऊस शेन्झेनचा समावेश आहे, जे मार्चमध्ये जवळजवळ एक आठवडा पूर्ण लॉकडाउनमध्ये गेले होते.याचा तेथील उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला असल्याचे दिसून आलेले आहे. यातही पुढे चालून चीनमधील "किरकोळ विक्रीचा फटका आणखी मोठा असू शकतो, याचे कारण जेवणाच्या सेवा -- किरकोळ विक्रीच्या सुमारे १० टक्के काही प्रांतांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्या होत्या. " याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून आलेला आहे. चीन मधील गोल्डमन सॅक्सने अलीकडील आपल्या अहवालात या संदर्भात केलेले भाष्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. सध्या चीन मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे मोठे आर्थिक परिणाम एप्रिल २०२२ च्या सांख्यिकीय माहिती मध्ये दिसून येतील. यामुळे आर्थिक विकास पटली अधिक खालावून देशाच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक वाढ कमी होईल अशी अपेक्षा चीन मधील अर्थशास्त्रज्ञांना वाटत आहे. सध्या चीन मध्ये चवथ्या कोरोनाच्या लाटेचा डझनभर शहरांमध्ये संसर्ग आढळून आल्याने, बीजिंगने शून्य - कोविड पॉलीसिच्या दृष्टीकोनातून निकराचे प्रयत्न सुरु केलेले असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये कोविडच्या सामूहिक चाचणीची शिबिरे आयोजित करताना कोविडची सकारात्मक प्रकरणे अलग ठेवताना त्यांना क्लस्टर्स बाहेर ठेवलेले दिसून येत आहे. याचा परिणाम शांघायमध्ये जवळपास दोन आठवड्यांपासून दिसून येत असून जनतेच्या कडक हालचालींवर अंकुश निर्माण झालेला आहे. याचे कारण तेथील चाचणी केंद्र दररोज हजारोची प्रकरणे नोंदवत असून चीन मध्ये सध्या काळजी निर्माण झालेली आहे. यातील अनेक बहुतेक प्रकरणे तिक्ष्ण लक्षणे असलेली आहेत म्हणूनच हे चिंतनीय आहे. शांघाय हे शहर जगातील सर्वात व्यस्त कंटेनर पोर्टचे माहेरघर आहे. देशात आर्थिक विकासाचे महत्वपूर्ण ऑपरेशन चालू असताना, इंटरसिटी प्रवासावर लावण्यात आलेले निर्बंध हा चिंतेचा विषय आहे. चीनमध्ये ट्रक ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे तेथील मालाची वाहतूक ठप्प झालेली आहे. चीनच्या कॅपिटल इकॉनॉमिक्सचे अभ्यासक असलेल्या वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ ज्युलियन इव्हान्स - प्रिचर्ड यांनी आपल्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की, एप्रिल २०२२ च्या सुरुवातीपासून महामार्गावरील मालवाहू वाहनांचा दैनंदिन प्रवाह “तीव्र पद्धतीने कमकुवत” झालेला आहे. सध्या शांघायच्या अधिकारी प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सध्या चीनमध्ये सर्व रहिवाशांपर्यंत ताज्या अन्नाचा पुरवठा सुनिश्चित करण्यात अनेक अडचणी येत असून त्यात अपयशी ठरल्याबद्दल चीन मध्ये आग लागलेली आहे. सध्या तरी चीन समोर "शांघाय हा एक धडा आहे. चीनच्या इतर भागातील स्थानिक सरकारे देशांतर्गत ही आग भडकावण्याबाबत अधिक संवेदनशील होऊ शकतात. चीन साठी ह्या सर्वच संवेदनशील बाबी बनलेल्या आहेत. या संदर्भात OCBC बँकेतील ग्रेटर चायनाच्या संशोधन टीमचे प्रमुख टॉमी झी यांचे मत अत्यंत महत्पूर्ण असून तेथील परिस्थिती सर्वसामान्य नाही हेच दिसून येत आहे. "सरकारला लॉक डाउन करायचे असेल तर ते नंतर ऐवजी आधी लॉक डाउन करण्याचा प्रयत्न करतील," परंतु त्याचे सर्व विदित परिणाम हे सरकारला भोगावेच लागतील. यातून जनता अगदी प्रक्षुब्ध झालेली दिसून येत असून हा उद्रेक भविष्यात सरकारला भारी पडू शकेल. यात कोविडमुळे आणखी काही अल्पकालीन व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. हँग सेंग बँक चायना येथील मुख्य अर्थतज्ज्ञ डॅन वांग यांच्या मते इतर शहरांमधील आर्थिक निर्बंधांची नियंत्रणेही कडक राहतील. याचा परिणाम या जीडीपीवरती नक्कीच होणार असून चीनच्या अर्थव्यवस्थेचे अंतरंग आपण जसे समजतो तसे मात्र नाही हे खरे आहे. सध्याच्या परिस्थितीत “लॉकडाउनवर एकाच वेळी डझनभर किंवा ३० हून अधिक शहरे पाहणे अशक्य नाही,”. सध्या चीन अत्यंत 'जटिल, अनिश्चित' हेडवाइंड अशाच स्थितीला असूनही पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था ४.८% टक्क्यांनी वाढलेली आहे. चीनची अर्थव्यवस्था २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ४.८% टक्क्यांनी वाढली आहे ही चीन साठी तरी सध्या उपलब्धीच मानावी लागेल, जी मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ४% टक्क्यांनी वाढलेली होती. मार्चमध्ये किरकोळ विक्री एका वर्षाच्या आधीच्या तुलनेत ३.५% टक्क्यांनी घसरलेली आहे तर औद्योगिक उत्पादन गेल्या महिन्यात ५% टक्क्यांनी वाढलेले आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (NBS) ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेने अपेक्षांवर मात केलेली दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ४.८% टक्क्यांनी वाढ केलेली आहे. ब्लूमबर्ग विश्लेषकांच्या मध्यवर्ती सर्वेक्षणाने जानेवारी ते मार्च दरम्यान ४.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवलेला होता. मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ४ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. चीनने आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ साठी आपले सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचे लक्ष्य “सुमारे 5.5 टक्के” ठेवलेले आहे. सध्या तरी चीनची अर्थव्यवस्था व तिचे प्रदर्शन "देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वातावरण अधिकाधिक क्लिष्ट आणि अनिश्चित स्वरूपाचे होत आहे. चीन मधील आर्थिक विकास हा महत्त्वपूर्ण अडचणी आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे." या संदर्भातील NBS चे प्रवक्ते फू लिंगुई यांचे मत अत्यंत महत्वपूर्ण असून "पुढील जीडीपीच्या टप्प्याच्या प्रवृत्तीच्या संदर्भात, जरी अर्थव्यवस्थेवर अल्पावधीत थोडासा दबाव असला तरीही संपूर्ण आर्थिक वर्षाच्या दृष्टीकोनातून, चीनच्या अर्थव्यवस्थेने विकासाची पुनर्प्राप्ती प्रवृत्ती कायम राखणे अपेक्षित आहे." NBS ने जाहीर केलेल्या इतर आकड्यांमध्ये, औद्योगिक उत्पादन, उत्पादन, खाणकाम आणि उपयोगिता क्षेत्रातील प्रक्रिया ही, एक वर्षाच्या आधीच्या तुलनेत मार्चमध्ये ५% टक्क्यांनी वाढले आहे. जानेवारीच्या एकत्रित आकडेवारीच्या ७.५% टक्क्यांपेक्षा कमी आणि फेब्रुवारी महिन्यात त्यात पुन्हा घट झालेली आहे. आर्थिक विश्लेषकांच्या ब्लूमबर्ग सर्वेक्षणातील अंदाजापेक्षा जास्त होते, ज्याने मार्चमध्ये ४% टक्के वाढीचा अंदाज वर्तवलेला होता. किरकोळ विक्री मार्चमध्ये ३.५% टक्क्यांनी घसरली आहे. चालू आर्थिक वर्षानुसार, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या एकत्रित आकडेवारीत ६.८% टक्के वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या विश्लेषकांच्या सर्वेक्षणातील अंदाजापेक्षा हे कमी होते, ज्यात ३% टक्क्यांनी घसरण होण्याचा अंदाज होता. स्थिर-मालमत्ता गुंतवणूक – पायाभूत सुविधा, मालमत्ता, यंत्रसामग्री आणि उपकरणे यासह वस्तूंवरील खर्चाचा मापक – वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत, एका वर्षाच्या आधीच्या तुलनेत ९.३% टक्क्यांनी वाढलेला आहे. ब्लूमबर्गच्या विश्लेषकांच्या सर्वेक्षणात ८.४% टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा हे जास्त होते. सर्वेक्षण केलेला बेरोजगारीचा दर, चीनमधील बेरोजगारीचे अपूर्ण मोजमाप असून ज्यामध्ये देशाच्या लाखो स्थलांतरित कामगारांच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आलेला नाही, यात मार्चमध्ये हा दर ५.८% टक्के होता तो फेब्रुवारीमध्ये ५.५% टक्के होता. या वर्षी सर्वेक्षण केलेल्या शहरी बेरोजगारीच्या दराचे उद्दिष्ट “५.५% टक्क्यांच्या आत” ठेवण्यात आलेले आहे, गेल्या वर्षीच्या अहवालाच्या ५.१ टक्क्यांच्या तुलनेत हे ०.४% नी जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. सध्या तरी चीनच्या अपेक्षेच्या मानाने पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ मजबूत आहे. परंतु अनेक शहरांमध्ये कोविडच्या उद्रेकामुळे मार्चमध्ये चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने मंदावली आहे हे सत्य आहे. हा चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका किरकोळ विक्रीतील वाढ नकारात्मक झाल्यामुळे मोठा फटका बसलेला आहे.
झांग झिवेई यांच्या प्रतिपादनानुसार १६ ते २४ वयोगटातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये १६ टक्क्यांवर पोहोचला असून, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या एकत्रित आकडेवारीत १५.३ टक्क्यांवरून त्यात ०.७% पर्यंत बदललेला आहे. बीजिंगने यावर्षी ११ दशलक्षाहून अधिक नवीन शहरी नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, गेल्या वर्षी १२.६९ दशलक्ष जोडले गेले होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत, चीनने २.८५ दशलक्ष नवीन शहरी रोजगार निर्माण केल्याचे सांगितले आहे. चीनच्या वित्त मंत्रालय व ईकोनोमिक प्लानिंग ब्युरोच्या अहवालानुसार “ चीनची पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ मजबूत आहे. परंतु अनेक शहरांमध्ये कोविडच्या उद्रेकामुळे मार्चमध्ये चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने मंदावली आहे. याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असून तो कसा राहील हे आताच सांगता येणार नाही. सध्या तरी याची कारणमीमांसा शोधून काढतांना किरकोळ विक्रीतील वाढ नकारात्मक झाल्यामुळे देशाच्या जनतेच्या आर्थिक वापराला मोठा फटका बसलेला आहे ,” असे पिनपॉईंट अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य अर्थतज्ज्ञ झांग झिवेई यांचे प्रतिपादन आहे. आशियाई विकास बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अंदाजात अशी अपेक्षा केलेली आहे की, चीनची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये अजूनही ५% टक्क्यांनी वाढेल, चालू असलेल्या कोरोनाव्हायरस व्यत्यय देशात मोठ्या प्रमाणात असूनही त्याच्या अंदाजात सुधारणा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एकूणच स्थिती संशयास्पद स्वरूपाची वाटत आहे. यामुळेच चीनच्या आर्थिक विकासाचे आकडे व माहिती ही विश्वासार्ह नसते असे म्हटले जाते त्यात तथ्य असल्याचे दिसून येते. जागतिक बँकेने चीनच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज ५.४% टक्क्यांपेक्षा कमी करून या वर्षी ५% टक्के केलेला आहे. गेल्या आठवड्यात, प्रीमियर ली केकियांग यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक प्रगती ही अपेक्षेपेक्षा वाईट असून - अपेक्षेपेक्षा वाईट आर्थिक घडामोडी आणि अधिक अनिश्चितता साक्षांकित केल्यानंतर काही दिवसांनी "तातडीचे बदल करून आर्थिक विकास दर " वाढवलेला आहे अशीच दबक्या आवजात चर्चा आहे. केवळ चार दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निवेदनात अशाच प्रकारे अपेक्षेपेक्षा वाईट आर्थिक हेडविंड आणि अधिक अनिश्चितता दर्शविली होती. आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ च्या पहिल्या तिमाहीत चीनची ४.८% टक्के जीडीपी वाढ सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ही मार्च २०२२ मध्ये आर्थिक क्रियाकलाप कमकुवत होण्याआधी अधिकृत जानेवारी – फेब्रुवारीच्या सांख्यिकीय माहितीमध्ये दिसून आलेली वाढ हे प्रामुख्याने दिसून येत आहे. या बाबतीत टॉमी वू ह्या चीनच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या रिझर्व्ह आवश्यकता गुणोत्तरामध्ये किंवा बँकांनी राखीव ठेवलेल्या रोख रकमेतील भांडवल गुणोत्तरात अपेक्षेने कपात करण्याची घोषणा केलेली आहे. ज्यामुळे वाढत्या हेडविंड्समध्ये त्याच्या मंद होत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बरीच मदत होवू शकेल अशी अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ च्या पहिल्या तिमाहीत चीनची ४.८% टक्के जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मुख्यतः मार्च २०२२ मध्ये आर्थिक क्रियाकलाप कमकुवत होण्याआधी अधिकृत जानेवारी - फेब्रुवारी डेटामध्ये दिसून आलेली वाढ सध्यातरी ठीक परिस्थिती असल्याचे दर्शवत आहे, परंतु ही धोक्याची घंटा आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे प्रमुख चीन अर्थशास्त्रज्ञ टॉमी वू “मार्च २०२२ ची सांख्यिकीय माहिती असे सूचित करत आहे की, शेन्झेन आणि शांघायमधील लॉकडाऊन तसेच चीनच्या विविध भागांमध्ये लादलेल्या गतिशीलतेच्या निर्बंधांमध्ये चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. विशेषत: घरगुती वापरामध्ये हा परिणाम जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ च्या “दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या जीडीपी वाढीला अधिक उत्तेजित वेग देण्यासाठी मजबूत मॅक्रो-पॉलिसी प्रतिसादाची अपेक्षा आहे, परंतु प्रतिबंधित गतिशीलतेच्या संदर्भात प्रभाव मर्यादित असेल. धोरणात्मक उत्तेजनाची परिणामकारकता व्यापक प्रमाणात हालचाल प्रतिबंधित केली जाईल की नाही यावर हे सर्व अवलंबून असेल, त्यामुळे सरकारच्या आर्थिक दृष्टीकोनातील जोखीम नकारात्मक बाजूने कमी राहतील असा अंदाज आहे. चीनची अर्थव्यवस्था ही सध्या नकारात्मक मोड मध्ये असून चीनच्या जीडीपीची मंद गती आणि आर्थिक विकासाला अवरोध निर्माण करीत आहे हे दिसून येत आहे.
(लेखक हे जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत )