भारतातील खाद्यतेल किंमतवाढ आणि महागाईची पार्श्वभूमी

भारतातील खाद्यतेल किंमतवाढ आणि महागाईची पार्श्वभूमी
 
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे 
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९
ई-मेल : smitarajan76@gmail.com 

बॉक्स 
दरवर्षी इंडोनेशियामधून ६० लाख टन पामतेलाची भारतात आयात होत असते. यापैकी ३० लाख तन पामतेल हे इंडोनेशिया या देशातून आयात होत असते. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे ह्या खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळेच इंडोनेशिया या देशांनी निर्यात बंदी केली असून भविष्यात खाद्य तेलाच्या किंमती प्रचन प्रमाणात वाढणार आहेत. 
लेख   
रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. युद्धामुळे अनेक बाबींवर प्रभाव पडला पण सूर्यफूल तेलाच्या उपलब्धतेवर विशेष परिणाम झाला आहे. त्यामुळे पामतेलाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्य़ा इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घालत सर्वांनाच धक्का दिला आहे. ही निर्यातबंदी लागू करण्यात आलेली आहे. दरवर्षी इंडोनेशियामधून ६० लाख टन पामतेलाची भारतात आयात होत असते. यापैकी ३० ते ३५ लाख टन पामतेल हे इंडोनेशिया या देशातून आयात होत असते. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे ह्या खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळेच इंडोनेशिया या देशांनी पामतेलाच्या विदेशातील निर्यातीवर बंदी घातलेली असून त्याचा फटका भारतासारख्या सर्वात मोठ्या आयातदार देशाला बसलेला आहे. भारतात दरवर्षी वेगवेगळ्या देशातून १८० लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात येत असते. खाद्यतेलाच्या आयातीत चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. इंदोनेशियानी खाद्यतेलाच्या केलेल्या निर्यात बंदी मुळेच येणाऱ्या भविष्यात खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. पामतेलाचा पुरवठा इंडोनेशियाने अचानक थांबवण्याची घोषणा केल्यामुळे जगभरात खाद्यपदार्थ तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीच्या बंदीचा निर्णय घोषित करत सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या निर्यातीवर बंदी जाहीर केलेली आहे. यामुळे या तेलाच्या ज्या ज्या उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्या सर्वच प्रकारच्या उद्योगाला याचा फटका बसणार आहे.  देशातील खाद्यतेलाच्या टंचाईशी मुकाबला करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे इंडोनेशिया सरकारने जाहीर केले आहे. यामुळे पामतेलाचा वायदे बाजार ७ टक्क्यांनी वधारला आहे. त्याचवेळी इंडोनेशियातील पामतेलबियांचे वायदे मात्र कोसळले आहेत. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश स्वतःचा विचार करायला लागला आहे. यातही विशेषतः अन्नधान्याचा पुरवठा संरक्षित करण्याच्या मागे अनेक देश लागलेले आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खाद्यतेलाचा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशिया जेव्हा पामतेल निर्यात बंद करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या प्रकारची संदर्भ पडताळून बघितले जातात. Inflation in India च्या अहवालानुसार खाद्यतेलाची प्रचंड टंचाई निर्माण झालेल्या इंडोनेशियात लोक सरकारविरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमती नियंत्रणात ठेवणे हे इंडोनेशियन सरकार पुढचे मोठे आव्हान आहे. रमजान जवळ येत असल्यामुळे खाद्यतेलाचा देशभर सुरळीत पुरवठा करणे ही राष्ट्रीय मागणी असल्याचे इंडोनेशियाच्या उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. रिटेल दुकानांतून न मिळणारे खाद्यतेल, पामतेलाच्या भडकलेल्या किंमती आणि सणाचे दिवस यांमुळे पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेणे इंडेनेशिया सरकारला भाग पडले आहे. इंडोनेशियन सरकारच्या या निर्णयाच्या भारतावर विशेष परिणाम झालेला आहे. या निर्णयामुळे भारतीय बाजारातील ग्राहकोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्य़ा कंपन्यांची मिळकत कमी होणार आहे. त्याचबरोबर ब्रेड, बिस्किटे, चॉकलेट, साबण, सौंदर्यप्रसाधने महागणार आहेत. पामतेलाची टंचाई निर्माण झाल्यास सोयाबीन व सूर्यफूल तेलांचे भावही भडकणार आहेत. पामतेल चढ्या भावात उपलब्ध झाल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एफएमसीजी कंपन्यांची मिळकतही घटणार आहे. आणि विशेषत्वाने सामान्यांच्या खिशाला मोठा भार वाढणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, खाद्यतेलांचे भाव वाढतील, ज्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडेल असा अंदाज आहे. सध्या बाजारात १५ किलो चा तेलाचा डब्बा २४०० ते २५०० रुपयाला मिळत असून पामतेलाच्या बंदीनंतर याच्या किमतीत आणखी मोठी वाढ होणार आहे. रशिया युक्रेन युध्दामुळे भारतात सुर्यफुल तेलाची आवक ठप्प झालेली आहे. भारतात सौर्य्फुल व सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात विदेशातून आयात केली जात असते. अर्जेन्टिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून सोयाबीन तेलाची आयात केली जाते. अस्ध्या तेथील वातावरणातील बदलामुळे तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झालेला असून यामुळेच खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असयाचे दिसून येत आहे. 
( लेखक जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.) 

 

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय