बांगलादेशची अर्थव्यवस्था : वाढता महागाई दर आणि आर्थिक संकट

बांगलादेशची अर्थव्यवस्था : वाढता महागाई दर आणि आर्थिक संकट
 
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे 
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९ 
ईमेल : smitarajan76@gmail.com 
बॉक्स
निर्यातीच्या तुलनेत परकीय चलन पर्याप्त प्रमाणात मिळालेले नाही, त्यामुळे परकीय चलनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झालेली आहे.
लेख  
भारताच्या शेजारी असलेले राष्ट्र म्हणजे श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशातच आता बांगलादेशावरही आर्थिक संकटाचे ढग दाटून आलेले आहेत. बांगलादेश श्रीलंकेच्या वाटेवर असून तेथील अर्थव्यवस्थेत आर्थिक संकट चुकीच्या आर्थिक धोरणामुळे निर्माण झालेले आहे. आताच्या घडीला बांगलादेशकडे केवळ पाच महिने पुरेल इतकाच परकीय चलनाचा साठा शिल्लक आहे. अशातच श्रीलंका सध्या आर्थिक  दिवाळखोरीणे ग्रस्त झाल्यामुळे शेजारी देशांच्या अनेक अर्थव्यवस्थानी आपली आर्थिक दिवाळखोरी घोषित केलेली आहे. अशातच आता बांगलादेशावरही आर्थिक संकटाचे ढग दाटून आलेले आहेत. बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तू, इंधन, मालवाहतूक आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे बांगलादेशचा आयात खर्च वाढलेला आहे. जुलै २०२१  ते मार्च २०२२  या कालावधीत बांगलादेशकडून वस्तूंवर केल्या जाणाऱ्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे.
आयातीवरील खर्चात वाढ
बांगलादेशी प्रसारमाध्यमांमध्ये घडत असलेल्या प्रसारमाध्यमावरील चर्चांनुसार  बांगलादेशच्या आयातीवरील खर्च वाढलेला असला तरी त्या तुलनेत निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे व्यापार तूट सातत्याने वाढत आहे. आयातीवर अधिक डॉलर खर्च करावे लागत आहे, निर्यातीच्या तुलनेत परकीय चलन पर्याप्त प्रमाणात मिळालेले नाही, त्यामुळे परकीय चलनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झालेली आहे. सध्या बांगलादेशकडे असलेला परकीय चलन साठा शिल्लक असलेल्या रकमेतून, केवळ ५  महिन्यांसाठी  बांगलादेशच्या आयात विषयक गरजा व  आवश्यकता  वस्तूंची मागणी पूर्ण केल्या जाऊ शकते असा एकूणच अंदाज आहे. यातच जर जागतिक बाजारात वस्तू, क्रूड ऑइल आणि खाद्यपदार्थांच्या किमती  अशाच प्रकारे वाढत राहिल्या तर पाच महिन्यांपूर्वीच हा परकीय चलनाचा साठा संपू शकतो.  याचाच अर्थ असा की जागतिक बाजारपेठेतील इंधन व खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्यास पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न खर्चून ह्या वस्तू खरेदी कराव्या लागतील त्यामुळे हा परकीय चलनाचा साठ जून महिन्याच्या शेवटीच संपू शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आर्थिक वर्ष २०२१ – २०२२  च्या जुलै ते मार्च दरम्यान, बांगलादेशने २२  अब्ज डॉलर्सच्या किमतीचा औद्योगिक कच्चा माल आयात केलेला आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत ५४% टक्के अधिक आहे. जागतिक बाजारात  कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आयात खर्चात ८७%  टक्क्यांनी वाढ झालेली  दिसून आलेले आहे. 
निर्यात वाढली पण परकीय चलन कमी झाले
बांगलादेशचे निर्यात लक्ष २०२१ – २०२२ ह्या  आर्थिक वर्षाच्या १०  महिन्यांत पूर्ण झालेले आहे. बांगलादेशने ४३.३४  अब्ज डॉलरची उत्पादने निर्यात केलेली आहेत. जे गतवर्षीच्या तुलनेत ३५% टक्के अधिक आहेत. जुलै २०२१  ते एप्रिल २०२२ ह्या  दरम्यान, कपड्यांची निर्यात, चामड्याची निर्यात आणि त्याच्या उत्पादनांमध्ये एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. जून महिन्याची निर्यात आणि त्यातील उत्पादनांनीही जवळपास एक अब्ज डॉलर्सची कमाई केलेली आहे. अशा स्थितीत बांगलादेशचा आयात खर्च वाढलेला असला तरी, त्यांनी केलेल्या विदेशी व्यापाराच्या निर्यातीतून उत्पन्न वाढू शकते. मात्र निर्यात वाढलेली असली तरी उत्पन्नात मात्र घट झालेली आहे. बँक आणि खुल्या बाजारात डॉलरच्या दरात सुमारे ८ रुपयांची तफावत आहे. बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, बाहेरील देशात काम करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी २०२० – २०२१  मध्ये २६ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त परकीय चलन साठा पाठवला होता, जो २०२१ – २०२२  मध्ये १७  बिलियन डॉलर्सच्या जवळ आलेला आहे. याचं दरम्यान, अमेरिकन डॉलर्सच्या संकटाचा सामना करण्यासाठी बांगलादेश सरकारने लक्झरी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातलेली असून सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातलेली आहे. सध्या अनावश्यक खर्चाला कात्री लावतांना अत्यावश्यक नसलेल्या प्रकल्पांच्या बांधकामावर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या बांगलादेशकडे ४२  अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा शिल्लक आहे.
 वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे बांगलादेश आर्थिक संकटात 
सध्या मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमध्ये लाखो बांगलादेशी नागरिकांनी जगण्यासाठी मदत मागितलेली आहे. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेला बांगलादेशातील  काही अर्थशास्त्रज्ञ तज्ञ आर्थिक विश्लेषक कोरोना व्हायरस (आणि युक्रेनमधील युद्धाला दोष देतात, तर काही लोक सरकारच्या अपयशावर प्रकाश टाकण्यास तत्पर आहेत.  महामारीच्या काळात अनेक लोणच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत वस्तूंच्या किमती वाढल्यात. परिणामत: तेथील जनतेच्या  राहणीमानात घात घडून आलेली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याणे आपल्या उप्भोगावरील खर्चात बरीच कपात केल्याचे दिसून आलेले असून निम्न पातळीचे जीवन तेथील लोकांना जगावे लागत असल्याचे दिसून आले. ज्याचा अर्थ तेथील अनेक कुटुंबाला उपभोगावर व आवश्यक गरजावर कमी  प्रमाणात खर्च करावे लागल्याचे दिसून आलेले आहे.
 जगण्यासाठी  केवळ मुलभूत व अल्प गरजांवर भर 
 घराच्या भाड्यापासून ते खाद्यतेलाच्या किमतीपर्यंत, राहणीमानाचा प्रत्येक खर्च वाढत चाललेला  असल्यामुळे अनेकांचे जीवन प्रभावित झालेले दिसून आलेले असून दोन वर्षांपूर्वी महामारी सुरू झाल्यापासून अनेक व्यक्तींनी  नवीन काहीही खरेदी केलेले नाही." यात १० दशलक्षाहून अधिक लोकसंख्येची मेगासिटी असलेल्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रस्थानी आहे अशा शहरातील लोकांचे जीवन मरणप्राय अवस्थेला आलेले आहे. बांगलादेशात अनेक नागरिकांनी  "उबेर वापरणे बंद केलेले आहे. तेथील जनतेला दररोजच्या होणाऱ्या दरवाढीशी जुळवून घेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक साधने  वापरण्यास भाग पाडलेले आहे. बांगलादेशच्या रस्त्यावर भिकाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  "बांगलादेशची अर्थव्यवस्था ही दिवसेंदिवस कमकुवत होत आहे आणि  गरीब तसेच निम्न-मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे."
 महागाईचा दर अनिश्चित पातळीवर वाढत आहे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने उच्च आंतरराष्‍ट्रीय कमोडिटी किमतींमुळे बांग्लादेशमध्‍ये २०२२ – २०२३   या आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांक ५.९ % पर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे.  कोरोनाव्हायरस रोगाच्या  साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल देशात अन्न आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमती हा चिंतेचा विषय बनलेला आहे.  गेल्या वर्षाच्या शेवटी प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार, कोरोना ह्या साथीच्या रोगाने अंदाजे ३२  दशलक्ष लोकांना गरिबीत ढकललेले आहे.  तेतील अर्थतज्ञ दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांच्या वाढीसाठी सरकारला दोष देत आहेत.  बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियाई देशात फेब्रुवारीमध्ये सामान्य चलनवाढ ६.१७ % वर गेलेली होती, जी ऑक्टोबर २०२० नंतरची सर्वोच्च  अशी महागाई वाढ आहे.  खाद्यतेल, साखर आणि अंडी यांच्या किमतीत झपाट्याने वाढ झालेली आहे, ज्यामुळे महागाई वाढण्यास मोठा हातभार लागलेला आहे.  "बांगलादेश आपल्या खाद्यतेलापैकी ९५% परदेशातून आयात करतो. युक्रेन युद्धापूर्वी, प्रति बॅरल खाद्यतेलाची किंमत $७००  (US) (€६२९) होती; रशियाने त्याच्या शेजारी देशावर आक्रमण केल्यानंतर ते $१,९४० वर किंमत गेली." सध्याच्या स्थितीत  कोणत्याही अनुदानित किंमतीला खाद्य तेल  बांगलादेशात व्यापारी वर्ग विकू शकत नाही." जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेला प्रतिसाद म्हणून बांगलादेशनेही देशात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या द्रवरूप पेट्रोलियम गॅसच्या (एलपीजी) किमतीत या महिन्यात १२% वाढ केली.  देशभरातील अनेक घरे सरकारद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूला पर्याय म्हणून एलपीजी गॅस  वापरतात.
बांगलादेशी सरकार  द्वारा 10 दशलक्ष कुटुंबांना  आर्थिक मदत 
बांगलादेशी सरकारचे म्हणणे आहे की,  ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि जोपर्यंत जागतिक बाजार पुन्हा स्थिर होत नाही तोपर्यंत तो कमी होणार नाही.  "आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झालेला  दिसून येत आहे," गरजू लोकांना काही ग्राहकोपयोगी वस्तू सवलतीच्या दरात दिल्या जात आहेत. देत आहोत.  ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेश (TCB) दक्षिण आशियाई देशातील गरीब लोकांना सवलतीच्या दरात कमोडिटी वस्तू देत असते.  गेल्या महिन्यात, बांगला देशातील ३५  दशलक्ष कुटुंबांपैकी १० दशलक्ष कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना, सुमारे ५० दशलक्ष लोकांपर्यंत ही ऑफर देण्याची घोषणा केलेली होती." खाद्यतेल, साखर, मसूर आणि कांदे देशभरात अनुदानित किमतीत सरकारद्वारे  विकले जात आहेत."  "ढाक्या मधील १.२  दशलक्ष कुटुंबांना आणि इतरत्र ८.८  दशलक्ष कुटुंबांना यावर्षी एप्रिलपर्यंत हे  पुरविल्या गेलेले आहे. सरकारच्या या धोरणाला जनतेचे चांगले समर्थन मिळालेले आहे ."
 बांगलादेशी अर्थतज्ज्ञांच्या मत्ते  महागाई दरवाढीमागे सरकारचे अपयश 
 कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अनुदानित किमतीत ग्राहकोपयोगी वस्तू दिल्यास अल्पावधीत मदत होईल असे तज्ञांना वाटत असले तरी, बाजारावर नियंत्रण ठेवता येत नसल्याबद्दल ते सरकारला दोष देत आहेत.  युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) च्या देशाच्या अर्थशास्त्रज्ञ नाजनीन अहमद यांनी याकडे लक्ष वेधले असून बांगलादेशात उत्पादित केलेल्या खाद्य उत्पादनांच्या किंमती देखील अलीकडील काही महिन्यांत वाढलेल्या आहेत.  "या वर्षी देशात तांदूळ उत्पादन उत्कृष्ट होते. तरीही कोणत्याही वाजवी कारणाशिवाय त्याची किंमत वाढलेली आहे."  "बांगला देशच्या देशांतर्गत बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला येथे भूमिका बजावावी लागेल." अंतर्गत बाजाराला भाववाढीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने दीर्घकालीन योजना तयार करायला पाहिजे.  "वेगवेगळ्या प्रसंगी किमती वाढवणाऱ्या भ्रष्ट  व्यावसायिकांना रोखण्यासाठी एक देखरेख यंत्रणा आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांनी या संदर्भात एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून त्याचाच अभाव दिसून येत आहे.  दरम्यान, डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या आवाहनानंतर हजारो लोक या आठवड्यात संपूर्ण बांगलादेशात रस्त्यावर उतरले होते.  त्यांनी "व्यवसाय सिंडिकेट" तोडण्याची मागणी केली आणि आवश्यक वस्तू तसेच गरजू लोकांसाठी शिधापत्रिकेची बाजारातील फेरफार करण्याची मागणी केलेली होती. हे आर्थिक संकटानंतर निर्माण होणाऱ्या देशांतर्गत यादवी युद्दाचीच चिन्हे आहेत.
(लेखक जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठ नागपूर येथे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत ) 

 

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय