बहुराष्ट्रीय कंपन्यामधील रोजगार संधी : जागतिक मंदी आणि रोजगार संकोच

बहुराष्ट्रीय कंपन्यामधील रोजगार संधी : जागतिक मंदी आणि रोजगार संकोच
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९
ईमेल : smitarajan76@gmail.com
बॉक्स
करोना व्हायरसच्या धक्क्यानंतर आता संपूर्ण जगावर गेल्या काही दशकातील सर्वात मोठ्या मंदीची टांगती तलवार आहे. यामुळेच शेअर बाजारात देखील घसरणीचे चित्र आहे. विशेषत: टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या ५ - ६ महिन्यात फार मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अनेक अर्थतज्ज्ञांनी जागतिक आर्थिक मंदी ही फक्त काही दिवसांवर आलेली असल्याचे म्हटले आहे.
लेख
आज देशात ऑनलाईन रोजगाराच्या बऱ्याच संधी निर्माण झालेल्या असुन आजच्या जागतिकीकरणाच्या काळात ती जगाची गरज झालेली दिसून येत आहे. आज कॉर्पोरेट हाऊसेस मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या ऑनलाईन रोजगाराच्या तसेच वर्क फ्रॉम होम मधून संधी उपलब्ध करून देताना दिसत आहे. आज ज्यांच्याकडे अशा प्रकारचे कौशल्य असते ती मंडळी ऑनलाईन रोजगारातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करतांना दिसून येत आहेत. परंतु जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मात्र प्रत्यक्ष रोजगारावर जशी संक्रांत आली तशीच काही प्रमाणात अशाप्रकारच्या ऑनलाईन रोजगारावर सुध्दा आर्थिक मंदीचे सवत दिसू लागलेले आहे. गेल्या काही दिवसात अनेक प्रकारच्या दिग्गज कंपन्यांनी आर्थिक मंदीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली असून त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नोकर कपात देखील सुरू केलेली आहे. यात जर पाहायचेच झाल्यास कोणत्या कंपनीने काय निर्णय घेतले आहेत. करोना व्हायरसच्या धक्क्यानंतर आता संपूर्ण जगावर गेल्या काही दशकातील सर्वात मोठ्या मंदीची टांगती तलवार आहे. यामुळेच शेअर बाजारात देखील घसरणीचे चित्र आहे. विशेषत: टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या ५-६ महिन्यात फार घसरले आहेत. अनेक अर्थतज्ज्ञांनी जागतिक आर्थिक मंदी ही फक्त काही दिवसांवर आलेली असल्याचे म्हटले आहे. या क्षेत्रात तज्ञ असलेल्या काहींनीजागतिक मांडीला सुरुवात झालेली असून बाजारात मंदीचे आगमन झाले असल्याचे मान्य केलेले आहे. फक्त जागतिक मंदीच्या आगमनाची औपचारिक घोषणा झालेली नाही असे म्हटलेले आहे. या दरम्यान आंतराष्ट्रीय स्तरावरील बहुराष्ट्रीय कंपन्यावर याचा प्रभाव जाणवायला लागलेला आही. यात गुगल, अमेझॉन, अ‍ॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्लासह जगातील सर्व दिग्गज कंपन्यांनी येणाऱ्या आर्थिक मंदीला सामोरे जाण्याची तयारी केलेली असल्याचे दिसून येत आहे. या सर्वच आंतरराष्ट्रीय कार्पोरेट कंपन्यांनी आपल्या व्यवसायातील कर्मचारी कपात करणे सुरू केलेले आहे. बाजारपेठेतील अग्रक्रमावर असलेल्या काहीं बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भविष्यात केली जाणारी नवी भरती थांबवलेली दिसून आलेली आहे. याचा आजच्या स्थितीत देशांतर्गत रोजगारावर परिणाम झालेला दिसून आलेला असून त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच होतील असे दिसून येत आहे.
गुगल
जगातील मोठ्या कंपनी पैकी एक असलेल्या गुगलचा आर्थिक वर्ष २०२० – २०२१ मधील टर्न ओव्हर हा २५७.६३ यु. एस. बिलियन डॉलर्स ऐवढा असून गुगलची मुख्य कंपनी असलेल्या अल्फाबेटने चालू आर्थिक वर्षात केली जाणारी नवी नोकर भरती कमी केलेली आहे. गुगल या कंपनीचे मुख्य सीईओ सुंदर पिचाई यांनी इंटरनल मेमोमध्ये सांगितले होते की, गुगलने भलेही आता १० हजार जणांना नोकरी दिली असली तरी या वर्षी नव्या रोजगाराच्या संधी कमी केल्या जातील असा अंदाज आहे. अन्य कंपन्यांप्रमाणे मंदीचा परिणाम गुगलवर देखील होईल. भविष्यात हा होणारा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी आजच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. आज घडीला गुगलकडे आता १ लाख ६४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
अॅमेझॉन
जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन या कंपनीचा समावेश होतो. या कंपनीचे संपूर्ण जगभरात २० मिलियन ग्राहक असून या कम्पनीच्या माध्यमातून अनेक व्यक्तीना रोजगार पुरविण्यात आलेला आहे. आज या कंपनीचे सांपत्तिक मुल्य ७५५ करोड रुपये ऐवढे असून २०२१ या वर्षातील आर्थिक प्राप्ती ही ४९४९ करोड रुपये ऐवढी आहे. मार्च २०२२ पर्यंत अॅमेझॉन सोबत एकूण १६ लाख कर्मचारी होते. एप्रिल महिन्यात कंपनीने म्हटले होते की, त्यांच्याकडे गरजेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जागतिक महामारीच्या प्रभावामुळे करोनाच्या प्रादुर्भावाने सुट्टीवर गेलेले कर्मचारी पुन्हा एकदा कामावर परतले आहेत. यामुळे अचानक कंपनी ही अंडरस्टाफवरून ओव्हर स्टाफ झालेली आहे. यामुळे कंपनीच्या तसेच कर्मचारी वर्गाच्या वेतनावर मोठ्या प्रमाणात कहरच होत असल्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. यामुळेच होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सध्या अॅमेझॉन कंपनीने त्याची काही गोदामे भाड्याने देण्याचा विचार केला आहे.
अ‍ॅपल
जगातील सर्वाधिक मोठ्या कंपनीत समावेश असलेल्या अॅपल या बहुराष्ट्रीय कंपनीचा आर्थिक वर्ष २०२० – २०२१ मधील वार्षिक आर्थिक उलाढाल ही ३६५. ८१७ बिलियन अमेरिकन डॉलर्स ऐवढी होती सन २०२० च्या तुलनेत या संपत्तीच्या आर्थिक उलाढालीत ३३.२६% आर्र्हिक वाढ घडून आलेली आहे. एवढ्या मोठ्या कंपनीने जागतिक आर्थिक मंदीवर अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. पण ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टनुसार जागतिक आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात केली जाणारी नव्याने रोजगार भरती कमी केली जात आहे. या सोबतच काही विभागातील खर्च कमी करण्यावरसुधा कंपनीचा विचार सुरू आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कंपनीकडे १.५४ लाख कर्मचारी काम करत होते. मात्र जागतिक साखळीतील निर्माण झालेल्या अडथळयामुळे सध्या अॅपलने वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली असल्याचे म्हटलेले आहे.
फेसबुक
जगातील सर्वाधिक लोकप्रिय समाज मध्यम असलेल्या फेसबुकची मुख्य कंपनी मेटाने इंजिनिअरिंग भरती ३०% टक्क्यांनी कमी केलेली आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की,सध्या फेसबुक ही कंपनी आर्थिक अडचणीत आलेली असून आपल्या कर्मचारी वर्गाला निर्वाणीचा इशारा देतांना इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे बजावलेले आहे. या वर्षाच्या मार्चपर्यंत कंपनीकडे आता केवळ ७८ हजार कर्मचारी होते. भविष्यात नवीन कोणतीही कंपनीत भारती करण्याचे कोणतेही कारण नजीकच्या काळात दिसून येत नाही असे सांगितलेले असून या कंपनीतील नव्या भारती तूर्तास बंद राहतील असे संकेत दिलेले आहेत.
मायक्रोसॉफ्ट
बिल गेट्स यांच्या या कंपनीने मे महिन्यात आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, विंडोज, ऑफिस आणि टीम या ग्रुप्समध्ये केली जाणारी नवी भरती कमी केली जाणार आहे. ज्यामुळे जागतिक आर्थिक मंदी आलीचं तर त्याला सामोरे जाता येईल असा कंपनीचा विचार दिसून आलेला आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपात देखील केलेली आहे. सन २०२१च्या अखेरपर्यंत या कंपनीकडे १.८१ लाख कर्मचारी होते. नवीन येणाऱ्या काळात मात्र नव्या रोजगार संधीचे कोणतेही कारण दिसून आलेलं नाही.
नेटफ्लिक्स
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममधील नेटफ्लिक्स या आघाडीच्या कंपनीने आपल्या कार्यालयातील कर्मचारी कपात सुरू केलेली आहे. या कंपनीने मे महिन्यात आतापर्यंत १५० जणांना घरी पाठवलेले आहे. त्यानंतर जूनमध्ये ३०० जणांना कामावरून कमी केलेले आहे. या कंपनीला अनेक कारणामुळे सबक्राइबर्समध्ये तोटा सहन करावा लागलेला दिसून आलेला असून पहिल्या तिमाहित यात २ लाखांनी घट झालेली होती. पुढे तर जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत ९.७० लाखांनी घट झालेली होती. गेल्या वर्षापर्यंत कंपनीकडे ११ हजार ३०० कर्मचारी होते. आता त्यात पुन्हा बरीच घट होण्याचे संकेत दिसून येत आहे.
टेस्ला
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या ऐलन मस्क यांच्या मालकीची कंपनी असलेल्या टेस्लाने जून महिन्यात कॅलिफोर्निया येथील आपली एक फॅसिलिटी बंद केली होती. यामुळे २०० कर्मचाऱ्यांवरती घरी बसण्याची वेळ आलेली होती. ऐलन मस्क यांनी स्वत: जागतिक स्वरूपाच्या आर्थिक मंदीची शक्यता वर्तवलेली आहे. जागतिक आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणे गरजेचे आहे. पुढील ३ महिन्यात कंपनीत कार्यरत असलेल्या १० टक्के कर्मचाऱ्यांची भविष्यात नोकरी जाऊ शकते. सन २०२१ च्या अखेरपर्यंत टेस्लाकडे १ लाख कर्मचारी होते. यात आणखी घट होण्याची बरीच शक्यता दिसून आलेली आहे.
अन्य टेक कंपन्या
अन्य टेक कंपन्यांमध्ये ट्विटर या सोशियल मीडियातील आघाडीची कंपनी असलेल्या या कंपनीने मे महिन्यांपासून नोकर भरती थांबवलेली आहे. ऑनलाइन फर्निचर रिटेल वेफयर इंकने देखील असाच निर्णय घेतलेला आहे. युनिटी सॉफ्टवेअर कंपनीने आपले ४% टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले आहे. युस्पॉटिफायने २५% टक्के तर नेनेतिक इंकने जून महिन्यात ८% टक्के कर्मचारी कमी केलेले आहेत.
एकंदरीत जागतिक मंदीच्या भीतीने धास्तावलेल्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने सुरक्षिततेचा उपाय म्हणून आतापासौनच आपल्या हातातील सूत्रे आवळण्यास सुरुवात केलेली आहे.
(लेखक जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथे उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत )

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय