अलौकिक प्रतिभेचे धनी : युगपुरुष स्वामी विवेकानंद
अलौकिक प्रतिभेचे धनी : युगपुरुष स्वामी विवेकानंद
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
Smitarajan76@gmail.com
बॉक्स
आज कधी नव्हे ऐवढी पौरात्य आणि पाश्चिमात्य देशांना स्वामीजींच्या विचारांची आवश्यकता जाणवायला लागलेली आहे. आजचे जग एकीकडे भारतीय विचारधारेच्या मागे धावत असतांना आम्ही भारतीय मात्र स्वत:चे स्वत्व हरवून भौतिकतेच्या मागे धावायला लागलेलो आहोत. आजच्या वैश्विकीकरणाच्या काळात देशातील युवा पिढी भौतिक विकासाच्या मागे जात असतांना आपले संपूर्ण वैचारिक अधिष्ठानाबरोबरच आपले कर्तुत्व हरवीत चाललेली आहे. भारतीय समाजातील आजचा तरुण भौतिक विचार व आध्यात्मिक अधिष्ठान या विचारांच्या द्वंद्वात अडकलेला दिसून येत आहे.
लेख
या विश्वाला प्रचंड उर्जा देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारीला १८६३ रोजी प. बंगाल मध्ये कोलकाता येथे झाला. भुवनेश्वरी देवीचे पुत्र असलेल्या व पुढे विश्व लोकपुत्र म्हणून नावारुपास आलेल्या या अलौकिक पुत्राचा शंख वाजवून मंगल ध्वनिनिनाद करून त्यांचे कुटुंबात स्वागत केले गेले. अशा एका महान व्यक्तिमत्त्वाच्या जन्मामुळे आजही भारतमातेला आपल्या या महान पुत्रावर अभिमान आहे. या मुलाचे लहानपणापासूनच पाळण्यात पाय दिसत होते. या दिव्य अलौकिक मुलाचे रूप पाहून त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त यांच्यासारखे होते. विश्वनाथ दत्त यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलाचे नाव दुर्गाचरण ठेवण्याची ईच्छा व्यक्त केलेली होती , परंतु आईने पाहिलेल्या स्वप्नावर आधारित मुलाचे नाव विश्वेश्वर ठेवण्यात आले. एक राशीनुसार आणि दुसरे सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी एक सामान्य नावआणि दुसरे एक नाव ठेवण्यात आले. छोट्या नरेंद्राची बुद्धिमत्ता लहानपणापासूनच अत्यंत तिक्ष्ण होती. आपल्या बालपणी नरेंद्र खूप खोडकर होते. लहानपणी आपल्या मुलावरती चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना आईच्या तोंडून रामायण - महाभारताच्या कथा ऐकवल्या जात असत. त्यांना ह्या गोष्टी बालपणी आवडायच्या सुद्धा, याबरोबरच लहानपणी नरेंद्रनाथ यांना ट्रेनमध्ये फिरणे अत्यंत आवडायचे. जेव्हा त्याना कोणी विचारले की, तू मोठा झाल्यावर काय बनने आवडेल? तेव्हा ते म्हणायचे की मी मोठा झाल्यावर शिक्षक होईल. परंतु ईकडे पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे वडील विश्वनाथ दत्त यांना आपल्या या लाडक्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन पाश्चात्य सभ्यतेत रंगवायचे होते. पण नियतीने काही खास हेतूनेच या धरतीवर या मुलाला जन्म दिलेला होता असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला जागतिक ओळख कोणी दिली असेल तर ते नरेंद्र दत्त उर्फ स्वामी विवेकानंद होते. जर कोणाला जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीला नवी ओळख देण्याचे श्रेय जात असेल तर ते स्वामी विवेकानंद आहेत. नरेंद्र यांना व्यायाम, कुस्ती, क्रिकेट इत्यादीं खेळांमध्ये विशेष रस होता. कधीकधी ते मित्रांसह विनोदांमध्ये सुद्धा सहभाग घेत असत. नरेंद्र दत्त बद्दल एकदा जनरल असेंब्ली कॉलेजचे अध्यक्ष मुगलम हस्ती म्हणाले होते की, नरेंद्रनाथ हा तत्वज्ञानाचा एक उत्कृष्ट विद्यार्थी असून त्याच्या सारखा मेधावी छात्र हा जर्मनी आणि इंग्लंडमधील सर्व विद्यापीठांमध्ये सुद्धा कितीही पहिले तरी सापडणार नाही. माझ्या पाहण्यात नरेंद्रनाथांसारखे गुणवंत विद्यार्थी कुठेही दिसून आलेले नाहीत. नरेंद्राच्या व्यक्तीमत्वात जे काही महानपण आहे ते त्याच्यावर झालेल्या सुसंस्कार आणि त्याच्या सुशिक्षित आणि विचारवंत असलेल्या आईच्या शिक्षणाचा हा परिणाम आहे. त्याच्यात लहानपणापासूनच दैवीशक्ती व उर्जा आणि अलौकिक ज्ञान मिळण्याची इच्छाशक्ती निर्माण झालेली होती. नरेंद्रनाथ यांच्या वरती अध्यात्म व तत्वज्ञान यांचा खूपच प्रभाव होता. सुरुवातीची नास्तिक प्रवती व नंतरचा बदल सोडला तर त्यांच्या कुशाग्र बुध्धीमत्तेवर डेकार्टचा अहंकारवाद, डार्विनचा उत्क्रांतीवाद, व हर्बट स्पेंसरचा एकेश्वरवाद यांचा विशेष प्रभाव होता. या सर्व विषयावरील अलौकिक ज्ञान ऐकल्यावर नरेंद्रनाथ अंतिम सत्य व त्याचा शोध घेण्यास ते उत्सुक झालेले होते. खूप ठिकाणी वेगवेगळ्या धर्मग्रंथात सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मनासारखे कुठेही उत्तर मिळालेले नव्हते. आपले अंतिम ध्येय काय आहे? आपला जन्म कशासाठी झालेला आहे याचा शोध अजूनही त्यांना लागलेला नव्हता. त्यांच्या मनाची अस्वस्थता ही दिवसेंदिवस अधिकच प्रबळ होवू लागलेली होती. नरेंद्रनाथांना जसे बौद्धिक अधिष्ठान पाहिजे होते तसे त्यांना मिळालेले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेल्या अंतिम सत्याचा त्याना अजूनही शोध लागलेला नव्हता. ते आपले जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते ब्राम्हो समाज येथे गेले, परंतु तेथे सुद्धा त्यांचे मन शांत झालेले नव्हते. याचकाळात रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचलेली होती. परंतु एकदा रामकृष्ण परमहंसांची स्तुती ऐकून नरेंद्र अंतिम तर्कांच्या शोधासाठी एका विशिष्ट उद्देशाने त्यांच्याकडे गेले. रामकृष्ण परमहंसांच्या विचारांनी ते अत्यंत प्रभावित झालेले होते. याचवेळी रामकृष्ण परमहंसांना नरेन्द्रनाथानी गुरु म्हणून स्वीकारले. परमहंसांच्या कृपेने त्यानी दक्षिणेश्वरी असलेल्या मॉ काली यांचे दर्शन झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रिय शिष्यांमध्ये नरेंद्र हे सर्वोपरि होते. अगदी वयाच्या २५ व्या वर्षी नरेंद्र यांनी भगवी वस्त्र परिधान करुन सन्यास घेतला आणि येथूनच स्वामी विवेकानंदांचा स्वामी म्हणून जन्म झाला. याच क्षणी ते अंतिम सत्याच्या शोधासाठी बाहेर निघाले. सन १८९३ मध्ये ते शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले, पण त्यावेळी युरोपमधील भारतीयांच्या निकृष्ट मनोवृत्तीचे दर्शन तिथेही झाले. अनेकांनी त्याना रोखण्याचे अनेक प्रयत्न केलेत. या प्रदीप्तमान उगवत्या सूर्याला रोखण्याचे मात्र कोणामध्येही सामर्थ्य नव्हते. अशाही स्थितीत तेजाळलेल्या सूर्याला झाकण्याचा क्षिण प्रयास काही धर्ममार्तंडांनी केले. निराशेचे काही क्षण त्यांच्याही मनात आले, परंतु छोट्याशा निराशेने थांबणारे स्वामीजी नव्हते. यानिमित्याने अमेरिकेतील एका प्राध्यापकाने प्रामाणिक प्रयत्न करून स्वामीजींना या जागतिक धर्मसंसदेत बोलण्याची संधी मिळाली. स्वामीजीनी उपस्थित श्रोत्याना माझ्या बहिण आणि भावानो म्हणून संबोधित केले. स्वामीजींच्या तोंडून हे शब्द उपस्थित श्रोत्यांनी ऐकून त्यांचे प्रचंड टाळ्याच्या कडकडाटासह त्यांचे स्वागत मोठ्या आवाजात करण्यात आले. प्रेक्षक त्यांचे भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले आणि त्याना दिलेली वेळ केव्हा संपली हे ठाऊक सुद्धा झाले नाही पुढे स्पीकर गिब्न्सच्या विनंतीनुसार स्वामीजी पुढे बोलू लागले आणि २० मिनिटांपेक्षा जास्त काळ ते बोलत राहिले. स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक भाषणामुळे यातील अनेक श्रोते विस्मित होऊन त्यांचे पुढे शिष्य बनले. स्वामीजींनी आपल्या व्याख्यानातून हे सिद्ध केले होते की हिंदू धर्म हा संपूर्ण विश्वात सर्व श्रेष्ठ आहे, त्यात सर्व धर्म व त्याच्या तत्वांना आपल्यात समाविष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. हिंदू धर्माच्या या सर्वसमावेशकतेमुळे व आपल्या मधुर वाणीने या आश्चर्यकारक रीतीने या सन्यासी माणसाने साता समुद्रापार भारतीय संस्कृतीचा झेंडा पसरविला. या जागतिक दिग्विजयाचा सुगंध अजूनही संपूर्ण विश्वभर दरवळत आहे. या भूतलावावर काळाच्या ओघात अनेक पुरुष जन्माला येतात. यातील काही पुरुष आपल्या कार्यकर्तुत्वानी मोठे होतात. इतिहास सुद्धा त्यांची दखल घेतो. ते इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये थोर पुरुष म्हणून आपले स्थान मिळवतात. काही माणसे आपल्या अलौकिक कार्यांनी इतिहासाचा प्रवाहच बदलवून टाकतात ते इतिहासात महापुरुष म्हणून गणले जातात. परंतु काही माणसे आपल्या दिव्य तेजाने संपूर्ण काळाचाच प्रवाह बदलवून टाकतात, इतिहास त्यांची दखल घेतो. अशी माणसे युगपुरुष म्हणून इतिहासात सदैव प्रेरणा देत राहतात. यातीलच एक युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होत. रामकृष्ण परमहंसांची स्तुती ऐकून नरेंद्र प्रथम त्यांच्याकडे तर्कशक्तीच्या कल्पनेने गेले, परंतु परमहंस जी हे ओळखले की आपण तोच शिष्य आहे ज्याची आपण बरेच दिवस वाट पाहत होता. परमहंसजींच्या कृपेने त्यांची स्वत: ची मुलाखत घेण्यात आली आणि परिणामी नरेंद्र परमहंसजींच्या शिष्यांमध्ये प्रख्यात झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांचे नाव विवेकानंद ठेवले गेले. स्वामी विवेकानंदांनी त्यांचे आयुष्य आपल्या गुरुदेव स्वामी रामकृष्ण परमहंसांना समर्पित केले होते. गुरू प्रती अशी श्रद्धा आणि भक्तीमुळेच ते आपल्या गुरूचे शरीर आणि त्याच्या दिव्य आदर्शांची उत्तम प्रकारे सेवा करू शकले. नरेंद्राना गुरुदेव समजू शकले. वयाच्या २५ व्या वर्षी नरेंद्र दत्तने गेरुआ वस्त्र परिधान केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा पायी प्रवास केला. १९९३ मध्ये शिकागो (अमेरिका) येथे जागतिक धर्म परिषद झाली. स्वामी विवेकानंदजी तेथे भारताचे प्रतिनिधी म्हणून आले. त्यावेळी युरोप आणि अमेरिकेतील लोक वश झालेल्या भारतीयांकडे पाहत होते. स्वामी विवेकानंदांना सर्व धर्म परिषदेत बोलायला वेळ मिळाला नाही म्हणून तिथे लोकांनी प्रयत्न केले. अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नाने त्याला थोडा वेळ दिला पण त्याचे विचार ऐकून सर्व विद्वान आश्चर्यचकित झाले. मग अमेरिकेत त्याचे खूप स्वागत होते. तिथे त्याच्या भक्तांचा मोठा समुदाय होता. ते अमेरिकेत तीन वर्षे राहिले आणि तेथील लोकांना भारतीय तत्त्वज्ञानाचा एक अद्भुत प्रकाश प्रदान केला. 'अध्यात्मवाद आणि भारतीय तत्त्वज्ञानाशिवाय जग अनाथ होईल' स्वामी विवेकानंदांची ही दृढ श्रद्धा होती. अमेरिकेत त्यांनी रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा स्थापन केल्या. अनेक अमेरिकन विद्वानांना त्याचे शिष्यत्व प्राप्त झाले. स्वामीजी हे केवळ संन्यासी संतच नव्हते तर एक सच्चे देशभक्त, सुप्रसिध्द वक्ते, चिंतनशील विचारवंत, लेखक आणि मानवतावादी होते. दारिद्रीनारायनाची सेवा हीच मानवसेवा आहे असे त्यांचे अभिवचन होते. होते. १९०२ मध्ये कोलकातामध्ये अस्वास्थ्यानी पीडित असूनही स्वामीजींचे अलौकिक कार्य सुरूच होते. स्वामीजींनी या काळातही तनमनाने साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करून मानवतेचे एक उत्तम उदाहरण उभे करून दिले. स्वामी विवेकानंद यांनी १ मे १८९० रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनद्वारा समाजातील इतरांची सेवा आणि परोपकार यालाच कर्मयोग मानतात. स्वामीजींनी ३९ वर्षांच्या आपल्या छोट्या आयुष्यात केलेली हि अद्भुत कार्ये आगामी काळात पिढ्यांनी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील हाच आशावाद आहे. या महान विभूतीचे अंतिम कार्य संपून त्यांनी आपला देह ४ जुलै १९०२ रोजी या धर्तीवर ठेऊन अनंताच्या प्रवासाला निघालेत. स्वामीजींचे अलौकिक शरीर परमात्म्यामध्ये विलीन झाले. अशी भारत मातेची सुपुत्र नेहमी या धरित्रीवर जन्माला येत नाहीत. आज कधी नव्हे ऐवढी पौरात्य आणि पाश्चिमात्य देशांना स्वामीजींच्या विचारांची आवश्यकता जाणवायला लागलेली आहे. आजचे जग एकीकडे भारतीय विचारधारेच्या मागे धावत असतांना आम्ही भारतीय मात्र स्वत:चे स्वत्व हरवून भौतिकतेच्या मागे धावायला लागलेलो आहोत. आजच्या वैश्विकीकरणाच्या काळात देशातील युवा पिढी भौतिक विकासाच्या मागे जात असतांना आपले संपूर्ण वैचारिक अधिष्ठानाबरोबरच आपले कर्तुत्व हरवीत चाललेली आहे. भारतीय समाजातील आजचा तरुण भौतिक विचार व आध्यात्मिक अधिष्ठान या विचारांच्या द्वंद्वात अडकलेला दिसून येत आहे. अशाही स्थितीत जागतिक व्यासपीठावर आजचा भारत विश्व गुरू बनण्याच्या दिशेने आपली खडतर वाटचाल करीत आहे. हे राष्ट्रनिर्माणाचे कार्य करतांना राष्ट्राच्या उभारणीत अनेक महान विभूतींनी आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे, त्यात स्वामी विवेकानंद हे अग्रस्थानी आहेत. स्वामी विवेकानंदांच्या बहुआयामी विचारांच्या मंथनातून भारताच्या विश्वव्यापी कर्तुत्वाला नवी चालना मिळू शकेल हा विश्वास आहे. भविष्यातील या राष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वामीजींच्या विचारांचा वारसा उद्याच्या युवा पिढीला देणे आवश्यक झालेले आहे. स्वामीजींचे विचार हे चिरंतन आणि प्रकाशमान असून तो भारतीय सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेचा वारसा आहे. हा वारसा आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण पुढल्या पिढीला देवून आपणही सामिजींच्या विचारांचे पाईक होवू यात.
( लेखक हे जीवन विकास पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय येथे उपप्राचार्य असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत )