अधिकोषण क्रांती : स्विफ्ट तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय गोपनीय संदेश वहन व्यवस्था

अधिकोषण क्रांती : स्विफ्ट तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय गोपनीय संदेश वहन व्यवस्था
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
बॉक्स
सन २०२१ मध्ये SWIFT ने दिवसाला ४२ दशलक्ष संदेशांवर प्रक्रिया केलेली दिसून आली असून २०२० च्या तुलनेत हे प्रमाण ११.४ % जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. याचाच अर्थ असा आहे की, या सेवेचा वापर दिवसेंदिवस वाढत असून ही गोपनीय संदेश वाहन सेवा अधिक लोकप्रिय होत आहे.
लेख
सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स (SWIFT) ही एक अशी जागतिक दर्जाची नामवंत संस्था आहे की, जी जगातील सर्व देशांचे आंतरराष्ट्रीय मुद्रा देयकांचे हस्तांतरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली दिसून येत आहे . सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशन्स (SWIFT) ही एक विविध देश सदस्य असलेल्या मालकीची सहकारी स्वरुपाची संस्था आहे, जी सहभागी बँकांमधील पैशांच्या आंतरराष्ट्रीय हस्तांतरणासाठी सुरक्षित संदेश व्यवहार प्रदान करीत असते. सन १९७३ मध्ये १५ देशांतील २३९ बँकांनी सुरू केलेल्या, SWIFT ने १९७७ मध्ये जागतिक स्वरुपाची मेसेजिंग सेवा देण्यास सुरुवात केली. यात SWIFTnet ही मेसेजिंग सिस्टीम बँकांना आर्थिक व्यवहारांची माहिती शेअर करीत असते. विविध आंतरराष्ट्रीय स्वरूपातील देयक सूचनांसह परस्पर माहितीची सुरक्षितपणे देवाणघेवाण करण्यासाठी ही वित्तीय संस्था SWIFT हे तंत्रज्ञान सेवा वापरताना दिसून येतात. आज २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेल्या ११००० हून अधिक संस्थांना सेवा आंतरराष्ट्रीय गोपनीय संदेश वहन सेवा देण्यासाठी SWIFT ने गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ केलेली आहे. सन २०२१ मध्ये SWIFT ने दिवसाला ४२ दशलक्ष संदेशांवर प्रक्रिया केलेली दिसून आली असून २०२० च्या तुलनेत हे प्रमाण ११.४ % जास्त वाढलेले असल्याचे दिसून आलेले आहे. याचाच अर्थ असा की, या सेवेचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून ही गोपनीय संदेश वहन सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सुरक्षित असल्यामुळे सर्वच देशात अधिक लोकप्रिय होत आहे. स्विफ्ट ही अशी विशिष्ट कोड स्वरूपातील आकड्यात एक गोपनीय सुरक्षित संदेश प्रदान करणारी व्यवस्था आहे की, जी विविध देशांना आपली सेवा पुरवीत असल्याचे दिसून येते. सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स (SWIFT) सहभागी बँकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी एक सुरक्षित संदेश प्रणाली प्रदान केलेली आहे. SWIFT या तंत्रज्ञानाचा वापर आजघडीला जगातील २०० पेक्षा जास्त देश आणि विविध प्रदेशांमध्ये केला जात असून ११,००० पेक्षा जास्त वित्तीय संस्थांना ही संस्था सेवा देत असल्याचे दिसून आलेले आहे. SWIFT ही अशी संस्था आहे की, सहभागी सदस्य असलेल्या विविध वित्तीय संस्थांना आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी एक अद्वितीय कोड नियुक्त करीत असल्याचे दिसते. यात बॅंकिंग क्षेत्रातील सुरक्षित संदेश वहनाचे कार्य पार पडले जाताना दिसून येते.
SWIFT ची प्रक्रिया कशी चालते?
SWIFT ने टेलेक्स कडून आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरणाची पडताळणी करण्यासाठी प्राथमिक प्रणाली म्हणून कार्यभार स्वीकारला असून ही संस्था त्यांचे सदस्य असलेल्या विविध बँकांना ओळखण्यासाठी आणि त्या बँकांच्या आर्थिक व्यवहारांचे वर्णन करण्यासाठी एक एकीकृत कोडिंग कन्व्हेन्शन प्रदान केले जात असते.
स्विफ्टची पार्श्वभूमी
SWIFT चे मुख्यालय हे बेल्जियममध्ये असून ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, जर्मनी, घाना, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, केनिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, मेक्सिको, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, या देशांमध्ये यांची कार्यालये आहेत. स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, यु ए ई आणि युनायटेड किंगडम या देशातील अंदाजे ३,५०० भागधारक संस्थांना SWIFT मधील शेअर होल्डिंग स्टेक आणि त्यांच्या देशाच्या मेसेजिंग सिस्टमच्या वापराच्या आधारावर संचालक मंडळाला नामनिर्देशित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. या प्रणालीचा वापर करून जगातील शीर्ष सहा देशांपैकी प्रत्येकी भागधारक असलेल्या प्रत्येक देशासाठी दोन संचालक नियुक्त करण्याचे मंडळाला अधिकार देण्यात आलेले आहेत. या नियमाप्रमाणे संचालक मंडळ नामनिर्देशित करीत असतात. SWIFT च्या वापराद्वारे पुढील १० देशांतील प्रत्येक भागधारक प्रत्येकी एक संचालक नामनिर्देशित करतात, तर इतर भागधारक एकत्रितपणे तीन संचालकांना नामनिर्देशित करू शकतात. स्विफ्टच्या संचालक मंडळामध्ये सध्या यू.एस., यू.के. फ्रान्स, बेल्जियम आणि स्वित्झर्लंडमधील प्रत्येकी दोन संचालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतर संचालक सदस्य असलेल्या देशामध्ये रशिया, नेदरलँड्स, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, चीन, इटली, स्वीडन, लक्झेंबर्ग, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान आणि हाँगकाँग या देशातील सदस्यांचा समावेश आहे. जरी संचालक स्वत: देशांच्या प्रतिनिधित्वाऐवजी विशिष्ट देशांतील भागधारक संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारात राष्ट्रीय सरकार त्यांच्या नियामक अधिकारांद्वारे वित्तीय संस्थांवर तसेच विविध आर्थिक निर्बंध शासनांवर मात्र आपला प्रभाव टाकू शकतात असे काही प्रकरणामध्ये दिसून आलेले आहे.
स्विफ्टची कार्य प्रणाली
विविध तंत्रज्ञानाद्वारे मुद्रेच्या हस्तांतरणासाठी, SWIFT प्रत्येक सहभागी असलेल्या आर्थिक संस्थेला ८ किंवा ११ वर्णांसह एक अद्वितीय कोड नियुक्त करीत असते. या गोपनीय कोडला तीन अदलाबदल करण्यायोग्य नावे देण्यात येतात. ही बँक आयडेंटिफायर कोड (BIC), SWIFT कोड, SWIFT ID किंवा ISO 9362 कोड या नावानी ती पाठविली जाताना दिसून येतात. उदाहरणार्थ मिलानमध्ये मुख्यालय असलेल्या इटालियन बँक UniCredit Banca, UNCRITMM हा आठ-वर्णांचा SWIFT कोड आहे. पहिले चार वर्ण इन्स्टिट्यूट कोड (UniCredit Banca साठी UNCR) दर्शवतात, तर पुढील दोन देश कोड (इटलीसाठी IT) वापरलेले आहेत. यात दिलेला अंतिम वर्ण हा स्थान / शहर कोड (मिलानसाठी MM) निर्दिष्ट करतात. जर एखाद्या संस्थेने ११ वर्णांसह कोड वापरण्याचे ठरवले, तर शेवटचे तीन पर्यायी वर्ण वैयक्तिक शाखा दर्शवू शकतात. उदाहरणार्थ, मिलानमधील UniCredit Banca शाखा UNCRITMMXXX कोड वापरते. बोस्टनमधील TD बँकेच्या शाखेच्या ग्राहकाला व्हेनिसमधील UniCredit Banca शाखेत बँक व्यवहार करणाऱ्या मित्राला पैसे पाठवायचे आहेत असे समजा. बोस्टोनियन मित्राचा खाते क्रमांक आणि UniCredit Banca Venice च्या अद्वितीय SWIFT कोडसह TD बँकेच्या शाखेत जाऊ शकतो. TD बँक पेमेंट ट्रान्सफरसाठी विशिष्ट UniCredit Banca शाखेला त्याच्या सुरक्षित नेटवर्कद्वारे एक SWIFT संदेश पाठवेल. एकदा UniCredit Banca ला येणा-या पेमेंटबद्दल SWIFT संदेश प्राप्त झाला की, ते मित्राच्या खात्यात पैसे क्लिअर करेल आणि क्रेडिट करेल. अशाप्रकारे मुदेचे हस्तांतरण होणे सहज शक्य होत असते. आंतरराष्ट्रीय मुद्रांचे हस्तांतरण करण्यासाठी ही सर्वोत्तम अशी गोपनीय सुविधा असल्याचे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सिध्द झालेले आहे.
स्विफ्ट विरुद्ध आय बान
स्विफ्ट आणि आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक (IBANs) हे दोन्ही मनी ट्रान्सफरमधील पक्ष ओळखण्यासाठी वापरले जातात. तथापि विशिष्ट बँक ओळखण्यासाठी SWIFT कोड वापरला जात असताना, IBAN कोड आंतरराष्ट्रीय व्यवहारात सामील असलेले विशिष्ट बँक खाते सूचित करीत असतो. SWIFT आज SWIFT नेट मेसेजिंग सिस्टीमच्या पलीकडे विविध सेवा देण्यासाठी प्रयत्नरत असून SWIFT ने अनेक वर्षांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात विस्तार केलेला आहे. यामध्ये क्लाउड-आधारित कनेक्टिव्हिटी, अनुपालन आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. SWIFT हे जागतिक भांडवल प्रवाहासाठी इतके अविभाज्य बनलेले विशिष्ट उपकरण तंत्र आहे की, आज काही देशांच्या बाबतीत आर्थिक निर्बंधांचा एक प्रकार म्हणून तिच्या सेवांमध्ये दहशतवादी कारवायांना पैसा पुरविण्यासाठी दुरुपयोग केला जात असल्यास त्याच्या या सेवांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे भारतात सुद्धा काही दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त असलेल्या संघटनेचे निधी गोठविण्यासाठी सरकारने आपला विशेष अधिकार वापरून बंदी आणलेली आहे. सन २०१२ मध्ये, युरोपियन युनियनने आण्विक शस्त्र कार्यक्रमासाठी आखाती देशावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे SWIFT ने इराण मधील दहशतवादी संघटनांच्या निधीवर बंदी आणलेली होती. आज घडीला अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनासाठी निधी हस्तांतरण करण्यास प्रवेश बंद केलेला आहे. मात्र सन २०१६ मध्ये इतर निर्बंधांमुळे प्रभावित न झालेल्या इराणी बँकांसाठी नंतर प्रवेश पुनर्संचयित केला गेला. सन २०२२ मध्ये, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला शिक्षा म्हणून अनेक रशियन बँका SWIFT तंत्राज्ञाच्याना कार्यक्षेत्रामधून काढून टाकण्यात आलेल्या होत्या. यामुळे रशियाचे स्वत:चे यु पी आय नसल्यामुळे काही काळासाठी रशियात मुद्रा हस्तांतरणाचे आर्थिक संकट निर्माण झालेले होते.
आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक (IBAN) म्हणजे काय ? ते कसे कार्य करते
आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक (IBAN) ही एक स्वतंत्र मानक क्रमांकन असलेली प्रणाली आहे, जी जगभरातील बँक खाती ओळखण्यासाठी विकसित केल्या गेली आहे. मुद्रेचे हस्तांतरण करण्यासाठी या तंत्राद्वारे बँकेला सूचना देत असते. यानंतरच निधी हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेवून निर्देश देणारी बँक ही दोन पक्षांमधील निधी हस्तांतरणामध्ये भूमिका बजावणाऱ्या बँकांपैकी एक महत्वपूर्ण घटक असते. या प्रणालीद्वारे सुध्दा मुद्रेचे देयक हस्तांतरण पार पाडले जात असते.
स्विफ्ट तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय पर्यायी तंत्रज्ञान
स्विफ्ट हे असे संगणकीय वित्तीय उपकरण आधारित तंत्रज्ञान असून आजच्या घडीला स्विफ्टला पर्याय असलेले दुसरे कोणते तंत्रज्ञान आहेत हे पाहीले असता काही देशांनी अशा पर्यायी स्व्र्पाच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध सुरु केलेला असून आपली त्यानुसार तयारी सुरु केलेली आहे. (SPFS) हे एक असेच तंत्रज्ञान आहे जे, सिस्टम फॉर द ट्रान्सफर ऑफ फायनान्शियल मेसेजेस सेवे अंतर्गत प्रदान केले जात असतात. ही पर्यायी संदेश वाहन सेवा रशियाच्या सेंट्रल बँकने विकसित केलेली स्विफ्ट या आर्थिक हस्तांतरण प्रणालीची रशियन आवृत्ती आहे. सन २०१४ च्या क्रिमियाच्या आक्रमणानंतर रशियन सेंट्रल बँकेने याची स्थापना केलेली होती. बँक ऑफ रशियाची फायनान्शिअल मेसेजिंग सिस्टीम (FMS) हे एक पर्यायी इलेक्ट्रॉनिक आर्थिक मेसेजिंग चॅनेल बनवलेले आहे, ज्याला अनेकदा 'स्विफ्ट अॅनालोग म्हणून संबोधले जाते. हे तंत्रज्ञान FMS सदस्य असलेल्या देशांच्या वित्तीय संस्थामध्ये आर्थिक संदेशांच्या निर्बध प्रसारणाची हमी देताना दिसून येते. सध्या चीनकडे क्रॉस-बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टम (CIPS) नावाच्या स्विफ्ट तंत्रज्ञानाचा पर्याय देखील आहे. परंतु CIPS हे आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच लहान नेटवर्क आहे, ज्यामध्ये सुमारे १,३०० सहभागी जागतिक वित्तीय संस्था आहेत. आजच्या स्थितीत त्यापैकी बहुतेक अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. रिपल सारख्या आर्थिक तंत्रज्ञान कंपन्या पर्याय म्हणून इंटरलेजर प्रोटोकॉल क्रिप्टोकरन्सीच्या मागे कार्य करणा-या तंत्रज्ञानवर आधारित त्यांचे प्लॅटफॉर्म ऑफर करत आहेत. यात आंतरराष्ट्रीय देयके देण्याची दुसरी पद्धत म्हणजे क्रॉस-बॉर्डर रेमिटन्ससाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्या जात आहे. याबरोबरच युक्रेन युध्दा पासून धडा घेवून रशिया एका 'डिजिटल' रुबलवरही काम करत आहे, जो अजून लॉन्च व्हायचा आहे. याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासून पहिले तर भारत रशियनांकडून पुरवलेल्या काही ऑर्डर रद्द करू शकतो, देशांतर्गत निर्यातदारही काही ऑर्डर रद्द करण्याचा पर्याय निवडू शकतात. जर सर्व रशियन बँका स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर काढल्या गेल्या तर आंतरराष्ट्रीय देयके विलंबित होतील. अखेरीस यामुळे व्यापार प्रभावित होईल. यासाठी भारताने वोस्ट्रो व नोस्ट्रो हे नवे तंत्रज्ञान स्वीकारलेले आहे. भारताची रशियाशी व्यापारी तूट असल्याने काही बाबतीत वस्तु विनिमय प्रणाली सहज कार्यान्वित होऊ शकते. दोन देशाच्या विदेशी व्यापारातील चालू असलेली व्यापार तूट पाहता भारतावर होणारा परिणाम शेवटी मर्यादित असेल. भारत बहुतेक पेट्रोलियम उत्पादने, हिरे आणि इतर मौल्यवान दगड आणि खते रशियाकडून खरेदी करतो. त्याचप्रमाणे, ते भांडवली वस्तू, औषध उत्पादने, सेंद्रिय रसायने आणि वाहनांचे भाग मॉस्कोला निर्यात स्वरूपात पाठवत असते. भारताने वोस्ट्रो व नोस्ट्रो हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून आंतरराष्ट्रीय पर्याय काढला असल्यामुळे भविष्यात सध्या यावर काय परिणाम होईल हे पाहणे आवश्यक ठरते.
(लेखक जीवन विकास महाविद्यालय देवग्राम येथे पदवी महाविद्यालयाला उपप्राचार्य असून रा तू म नागपूर विद्यापीठ, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत)

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय