अंक परिचय एकता मासिक -मार्च–2026
अंक परिचय
एकता-मार्च–2026
वार्षिक वर्गणी-500(+250 पोस्टाचे)एकूण -750 रुपये
त्रैवार्षिक –1300( + 700 पोस्टाचे)एकूण -2000 रुपये
संपर्क- 8956977357
संपादकीय आहे 'हिंदूंचे सण आणि सांस्कृतिक मार्क्सवाद ' भारतीय समाज, कुटुंबसंस्था, सणपरंपरा, यावर डाव्या विचारसरणीचा वाढत प्रभाव, त्यातून भारतीय संस्कृती कशी नष्ट होते आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित परिषदेत हिंदुत्व म्हणजे काय? वसुधैव कुटुंबकम, धार्मिक मूल्ये, समाजाची अध्यात्मिक वाढ, वैश्विक जीवनप्रणाली, अशा गोष्टींचे विश्लेषण सरसंघचालक डॉ . मोहनजी भागवतांनी केले आहे. त्याचे विवेचन करणारा 'आर एस एस @100 ' हा डॉ.पंकज जयस्वाल यांचा लेख अवश्य वाचावा.
'वॊकिझम, संस्कृतीचा विनाश आणि एपस्टीन फाइल्स ' हा अभिजित जोग Abhijit Joag यांचा अभ्यासपूर्ण लेख भारतीय संस्कृती, हिंदू समाज रचना यांवर डाव्या विचारसरणीचे आक्रमण स्पष्ट करणारा आहे . वॊकिझम म्हणजे काय? LGBTQ , एपस्टीन फाईल्स , पेडोफिलिया आणि ते प्रमोट करणारी खेळणी याबद्दलच संपूर्ण विश्लेषण यालेखात केलेलं आहे.
डॉ . राजू श्रीरामे Arnaw Shrirame यांनी ' केंद्रीय अर्थसंकल्प-२०२६ ' यात
भविष्याचे आर्थिक नियोजन म्हणजे अर्थसंकल्प 2026 चे विवेचन केले आहे. मुख्य उद्देश विकसित भारत -2047 असून त्यामधून आर्थिक स्थैर्य राखणे, आणि समावेशक विकास साधने बरोबर कृषी, रस्ते विकास, मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास या विषयी यात सखोल विश्लेषण आहे .
'स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे सक्षमीकरण ' या Aparna Lalingkar
डॉ. अपर्णा लळींगकर यांच्या लेखातून भारतीय संस्कृती आणि स्त्रियांचे सक्षमीकरण याबाबतचे विवेकानंदांचे विचार वाचता येतील.
स्त्रीसक्षमीकरणाची चळवळ, त्याचा इतिहास, गीतेमधील संदर्भ, कुटुंबव्यवस्थेमधील स्त्रीचे महत्व, यासोबत स्त्रीचे शिक्षण व विचार स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकलेला आहे .
'सनातन वैदिक हिंदू धर्मातील काही पारिभाषिक शब्दांचे अर्थ ' हा भास्कर ब्रम्हनाथकर यांचा अप्रतिम लेख असून
वेद-वेदांग , श्रुती-स्मृती म्हणजे काय? गणपती अथर्वशीर्ष का म्हणावे? मंदिरातील मूर्तींचे दर्शन कसे घ्यावे? भगवंतांची कृपा कशा पद्धतीने होते? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखात आहे.
'आदर्श कुटुंबाची शक्ती-कांचन नितीन गडकरी ' या मुलाखतीमधून केंद्रीय राजकारणातील कर्तृत्ववान व्यक्तीची पत्नी होण्यातला प्रवास वाचायला मिळेल. आपले पती राजकारणामध्ये यशाच्या शिखरावर असताना आपण स्वतः कुटुंब, समाजसेवा यांचं संतुलन कसं राखलं, स्वतःचे छंद कसे जोपासले ? हे सर्व कांचन ताईंनी अश्विनी अडोनी Ashwini Adoni यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून दिलखुलासपणे सांगितले आहे.
'घराघरातील पणतींना जपूया ' हा सुजाता लेले यांचा लेख स्त्रीचे अस्तित्व विशद करणारा आणि तिच्याबद्दलच्या समाजाची जबाबदारी सांगणारा आहे .
'संघाचे घर ' या सदरात - संघमय घर - हा शुभदा भाले यांचा अनुभव हृदयस्पर्शी आहे. संघ प्रचारकांचा साधेपणा यातून जाणवतो .
तर
संघ म्हणजे काय? स्वयंसेवक होणे म्हणजे काय? कशासाठी? त्यातून सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांचं आकलन कसे होते? याबद्दलचा विचार सांगणारा 'वैभव देशमुख' यांचा 'संघ अनुभवातूनच समजतो ! ' हा लेख वाचावा 'मला समजलेला संघ ' या सदरात .
'मी संघाचा झालो ' या लेखात
रवींद्र मुनोत नेवासकर Newaskar Meridian यांनी वारकरी असतानाच संघाचा स्वयंसेवक होण्याच्या त्यांच्या प्रवासाचं सुरेख आणि अत्यंत प्रामाणिकपणे वर्णन केलं आहे.
'माझ्या लेखणीचा प्रवास ' या श्रीनिवास शारंगपाणी Shrinivas Sharangpani यांच्या लेखात, आपल्या लेखन प्रवासात चढ उतार आले तरी तो कायम चालू कसा ठेवला याचा विस्तृत अनुभव अवश्य वाचावा ..
'न्याय ' यात एका अतिसामान्य घरातल्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि समाजापुढे न्याय मांडणाऱ्या आजीच्या व्यथेचा आलेला अनुभव 'रवींद्र कुलकर्णी' यांच्या शब्दात वाचावा .
'उपकार ' ही आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व विशद करणारी 'सुजाता भडभडे' यांची अप्रतिम कथा आहे .
तर
'वाऱ्याला जखम फुलांची ' ही मृण्मयी गालफाडे Mrunmayee Vinay Galphade यांची उत्तम हृदयस्पर्शी कथा असून तिला पुणे नगर वाचन मंदिर आणि एकता मासिक फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट कथेचं पहिले पारितोषिक मिळाले आहे.
या अंकात स्वाती वर्तक, वि.ग . सातपुते Vilas Satpute आणि अक्षय जोशी अक्षय राजेंद्र जोशी यांच्या कविता आहेत.
असा हा एकताचा अंक वाचकांना नक्की आवडेल अशी आशा वाटते.