Posts

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी - 7620881729 बॉक्स आजचा भारत हा असा आहे, जो डोळ्यात डोळे घालून वाटाघाटी करतो आणि आपल्या अटींवर करार करून घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अमेरिकेसारख्या महासत्तेलाही ५० टक्क्यांहून अधिक असलेले दंडात्मक टॅरिफ मागे घेऊन ते थेट १८ टक्क्यांपर्यंत आणायला भाग पाडले. लेख आजच्या जागतिक राजकारणात व्यापार हा केवळ आर्थिक व्यवहार नसून तो राष्ट्राच्या स्वाभिमानाशी, सुरक्षिततेशी आणि भविष्यातील विकासाशी थेट जोडलेला असतो. अशा वेळी भारत–अमेरिका व्यापार कराराकडे पाहताना विरोधकांनी पसरवलेला संभ्रम आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. जेव्हा काही जण या कराराला “शरणागती” म्हणत आहेत, तेव्हा वास्तवात हा करार म्हणजे झुकलेल्या महासत्तेवर अटी लादणाऱ्या आणि न झुकणाऱ्या भारताचा ऐतिहासिक विजय आहे. एकेकाळी अमेरिकेने दंडात्मक करांची भीती दाखवून अनेक देशांना झुकवले आहे. पण आजचा भारत तो नाही, जो मदतीसाठी हात पसरायचा. आजचा भारत हा असा आहे, जो डोळ्यात डोळे घालून वाटाघाटी करतो आण...

अंक परिचय एकता मासिक -मार्च–2026

अंक परिचय एकता-मार्च–2026 वार्षिक वर्गणी-500(+250 पोस्टाचे)एकूण -750 रुपये त्रैवार्षिक –1300( + 700 पोस्टाचे)एकूण -2000 रुपये  संपर्क- 8956977357 संपादकीय आहे 'हिंदूंचे सण आणि सांस्कृतिक मार्क्सवाद ' भारतीय समाज, कुटुंबसंस्था, सणपरंपरा, यावर डाव्या विचारसरणीचा वाढत प्रभाव, त्यातून भारतीय संस्कृती कशी नष्ट होते आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित परिषदेत हिंदुत्व म्हणजे काय? वसुधैव कुटुंबकम, धार्मिक मूल्ये, समाजाची अध्यात्मिक वाढ, वैश्विक जीवनप्रणाली, अशा गोष्टींचे विश्लेषण सरसंघचालक डॉ . मोहनजी भागवतांनी केले आहे. त्याचे विवेचन करणारा 'आर एस एस @100 ' हा  डॉ.पंकज जयस्वाल यांचा लेख अवश्य वाचावा.  'वॊकिझम, संस्कृतीचा विनाश आणि एपस्टीन फाइल्स ' हा अभिजित जोग Abhijit Joag यांचा अभ्यासपूर्ण लेख भारतीय संस्कृती, हिंदू समाज रचना यांवर डाव्या विचारसरणीचे आक्रमण स्पष्ट करणारा आहे . वॊकिझम म्हणजे काय? LGBTQ , एपस्टीन फाईल्स , पेडोफिलिया आणि ते प्रमोट करणारी खेळणी  याबद्दलच संपूर्ण विश्लेषण यालेखात केलेलं...

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान? डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी - 7620881729 बॉक्स नेपाळमधील नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून उदयास आलेले बालेन शाह हे भ्रष्टाचारविरोधी भूमिका, प्रशासनातील पारदर्शकता आणि विकासाभिमुख राजकारण या मुद्द्यांवर पुढे आले आहेत. लेख दक्षिण आशियातील राजकीय घडामोडींमध्ये नेपाळचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारताचा जवळचा शेजारी असलेला नेपाळ सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या भारताशी घट्टपणे जोडलेला आहे. अलीकडील निवडणुकांनंतर नेपाळमध्ये नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाल्यामुळे भारत-नेपाळ संबंधांचे भवितव्य काय असेल, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नव्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर चीनचा प्रभाव, प्रादेशिक राजकारण आणि आर्थिक सहकार्य या बाबींचा विचार करणे आवश्यक ठरते. नेपाळमध्ये झालेल्या अलीकडील निवडणुकांमध्ये नव्या नेतृत्वाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय परिवर्तनाचा एक नवीन अध्याय सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. दीर्घकाळापासून नेपाळमध्ये अस्थिर सरकारे, राजकीय आघाड्या आ...

ब्लूमबर्ग रिपोर्ट, यू.एस. टॅरिफ आणि अजित दोबाल: भारत-अमेरिका संबंधांतील निर्णायक वळण

ब्लूमबर्ग रिपोर्ट, यू.एस. टॅरिफ आणि अजित दोबाल: भारत-अमेरिका संबंधांतील निर्णायक वळण डॉ. राजू श्रीरामे भ्रमणध्वनी - 7620881729 बॉक्स  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तियानजिन येथे भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल होताच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झाले. अमेरिकेला असे वाटू लागले की भारत चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जात आहे, ज्यामुळे अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी अजित दोबाल यांना वॉशिंग्टनला पाठवले, जेणेकरून भारत-अमेरिका संबंध पुन्हा स्थिर आणि मजबूत करता येतील. लेख अलीकडेच ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या रिपोर्टमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित दोबाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना कठोर शब्दांत सुनावल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भेटीनंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये आलेली कटुता कमी झाली आणि दोन्ही देशांचे संबंध अध...

पर्यायी आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि स्थानिक विकास समस्या

पर्यायी आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि स्थानिक विकास समस्या डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी : 7620881729 बॉक्स भारतातील बहुसंख्य विद्यापीठातून जे अर्थशास्त्र शिकवतात त्यात भारतीय माणसे कुठेच दिसत नाहीत. महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या वर्गात शिकवीत असताना फलकावर निरनिराळे वक्र खाली वर होत असतात, परंतु त्या विविध वक्रांच्या मागची प्रतिनित्व करणारी वंचित, पीडित, गरीब, दारिद्र्यात जीवन जगणारी माणसे कधीच पुढे येतांना दिसत नाहीत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात आर्थिक वाढ होताना समाजातल्या सगळ्या घटकांची एकाच वेळेस, एकसारखी वाढ कधीच होत नाही. लेख देशाच्या आर्थिक विकासाची सिद्धांत कशी असावीत याचा विचार करणे आज आवश्यक झालेले आहे. देशाच्या अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या अर्थतज्ञ मंडळींनी शक्य होइल तेवढे समाजातील भटके विमुक्त, आदिवासीं, वंचित, पशुपालक, धनगर, शेतकरी, कामकरी वर्ग, मासेमार, वगैरे समुहांशी जवळीक साधून त्यांच्याकडे जे संचित भांडवल आहे त्याची उपलब्धता व उपयुक्तता कशी आहे ते समजून घेतले पाहिजे. देशात आज आर्थिक विकासाचे पर्यायी मॉडेल उपलब्ध नाहीत असे नाही. देशातील आपल्...

इस्त्रालय – हमास युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम

इस्त्रालय – हमास युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम  डॉ. राजू घनश्याम श्रीरामे  भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९  बॉक्स  पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील नव्या युद्धामुळे आधीच आव्हानांचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थांना आता आणखी नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी जवळपास जागतिक अर्थव्यवस्था हि रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: विस्कळीत झालेली असून त्यात पुन्हा इस्त्रालय – हमास यांच्यातील युध्द संघर्षाची भर पडलेली आहे. भविष्यात हे युद्ध किती काळ चालेल हे अजूनही स्पष्ट दिसत नाही. लेख   इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा व्यापक परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेला आहे. या दोन देशात संघर्ष पेटताच आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी उजोरदार सळी घ्यायला सुरुवात केलेली आहे. भारतीय अर्थव्य़वस्था आणि भांडवल बाजारावर यांच्यावर अद्याप मोठा परिणाम झालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे परिणाम भूराजकीय, आर्थिक, तसेच पुरवठा साखळीबाबतचे आ...

देशातील उद्योगांचे स्थलांतरण : रोजगार निर्मिती आणि विदेशी गुंतवणूक

देशातील उद्योगांचे स्थलांतरण : रोजगार निर्मिती आणि विदेशी गुंतवणूक डॉ. राजू घनश्याम श्रीरामे भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९ बॉक्स कोव्हिड संकट काळात या सेमीकंडक्टर्सचं उत्पादन थांबलं किंवा धीम्या गतीने सुरू होतं, तेव्हा जगभरातील जवळपास 169 उद्योगांना यामुळे फटका बसलेला होता. अनेक बड्या कंपन्यांना करोडो डॉलर्सचं नुकसान झालेले होते. लेख मागील काही दिवसापासून सर्वाधिक चर्चा करण्यात आलेला विषय म्हणजे फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजराथमध्ये गेला. या काळात अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेत. याकाळात अनेक राजकीय आरोप झालीत. खरे तर या प्रकल्पातून सर्वाधिक रोजगार निर्मिती होणार होती. वेदान्ता फॉक्सकॉन वेदांत प्रकल्पाची किंमत ही 1 लाख 54 हजार कोटीं रुपये ऐवढी असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. फॉक्सकॉनने वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवण्यात आला होता. पण एका वर्षापेक्षा कमी कालावधीतच फॉक्सकॉनने या प्रकल्पातून स्वत: बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खरे तर हा प्रकल्प देशाच्या दृष्टीने कुठल्याह...